सध्याच्या काळात चित्रपट अभिनेते फ़क्त सिनेमा पुरते मर्यादीत न राहता बरेच जण वेगवेगले व्यवसाय करताना दिसत आहेत आणि त्यातून भरपूर पैसा ही कमावत आहेत. अनेक अभिनेत्री आपल्या ब्यूटी व्यवसायातुन तर काही अभिनेते ५ स्टार होटल मधून, तर काही व्हिस्की वोडका ब्रांड व्यवसयातुन पैसे कमावताना दिसत आहेत. त्यातच संजय दत्त (Sanjay Datta) याच्या पैशातून कार्टेल एंड ब्रदर्स यांनी स्कोच व्हिस्की चा द ग्लेनवाक (The Glenwalk) या नावाने ब्रांड चालु केला आहे. या ब्रांड ला व्हिस्की प्रेमी नि खुप पसंती दाखवली आहे त्यामुले थोड्याच दिवसात हां ब्रांड खुप प्रसिद्द झाला आहे. गेल्या वर्षीच चालू केलेला हा व्यवसाय संजू बाबा ला कोट्यवधी रुपयाचा नफ़ा मिलावुन देताना दिसत आहे.
द ग्लेनवाक (The Glenwalk) ब्रांड ची कमाई
समोर आलेल्या माहिती नुसार द ग्लेनवाक (The Glenwalk) ची मागच्या चार महिन्यात १ लाख ३० हजार बाटली ची विक्री झाली आहे. द ग्लेनवाक हा ब्रांडचा सध्या ठाणे, मुंबई आणि पुणे मधे खुपच जादा खप होत आहे. कमाई पाहिली तर ह्या चार ते साडेचार महिन्यातच या ब्रांड ची कमाई जवळ जवळ २० कोटि पर्यंत झालेली आहे. या ब्रांड ची किम्मत सर्व सामान्यांना परवाडनारी असल्यामुळे ग्राहकांनी याला पसंती दाखवली आहे. एक बाटली ची किम्मत सरसरी १५५० रु. ते १६०० रु पर्यंत आहे. पुढील वार्षिक सालामधे कंपनीचे लक्ष ३ दशलक्ष बाटल्या विकन्याचे धेर्य आहे.
बरेच अभिनेते ही करतात हा व्यवसाय
संजय दत्त ने या स्कॉच व्हिस्की व्यवसायात आपला जम बसविलेला आहेच परंतु संजय दत्त ( Sanjay Datta) च्या अगोदर ही जेष्ट अभिनेता डॅनी डेन्झोंगपा ( Dany) यानेही दारूच्या व्यवसायात भरपूर गुंतवनूक करुण पैसे कमावले आहेत. त्याची युक्सॉम ब्रुअरीज नावाने कंपनी आहे जी अनेक प्रकारच्या बियर बनवते. शाहरुख खान च मुलगा आर्यन (Aryan Khan) याने वोडका ब्रांड च्या दारू व्यवसायात गुंतवनूक केलि आहे. याप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) चा पति निक जोंस याने देखिल या व्यवसायात गुंतवनूक केलि आहे त्याच्या ब्रांड चे नाव व्हिला वन हे आहे.