बेळगाव—belgavkar—belgaum : कचरा वर्गीकरणावरून शास्त्रीनगर येथे सफाई कामगाराला मारहाण झाल्याची घटना घडली. शास्त्रीनगर येथील सातवा क्रॉस येथे ही घटना घडल्याची माहिती महापालिकेतून मिळाली आहे. तेथील एका दांपत्याने व त्यांच्या मुलाने सफाई कामगाराला मारहाण केली. या घटनेनंतर सफाई कामगाराने त्याच्या सहकाऱ्यांनी थेट खडेबाजार पोलिस ठाणे गाठले.
त्या तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे; पण या घटनेनंतर दांपत्य व त्यांचा मुलगा बाहेरगावी गेल्यामुळे पोलिसांकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. परत आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
रविवारी न्यू गांधीनगर येथे कचरा वर्गीकरणावरूनच सफाईकामगाराला मारहाण झाली होती. कचरा वर्गीकरणामुळे निर्माण झालेल्या या समस्येचा फटका संबंधित नगरसेवकांना बसू लागला आहे. अशा प्रकरणात नगरसेवकांनी कोणाची बाजू घ्यावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय नगरसेवकांना व लोकनियुक्त सभागृहाला विश्वासातन घेता थेट कचरा वर्गीकरण सक्ती केल्याने ही समस्या निर्माण झाल्याची तक्रार होत आहे. कचरा वर्गीकरण सक्ती केल्यामुळे घरांमधून ओला सुका व घातक कचरा वेगवेगळ्या दिला जात आहे; यावरुनचं वादावादी होवून मारहाणी होत आहे.
Sanitation worker beaten up in Shastri Nagar
Sanitation worker beaten up in Shastri Nagar