एका मुलीसोबतचा आमदारांचा व्हायरल फोटो

Belgaum Belgavkar
3 Min Read

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उचलणारे आणि आरोपींच्या अटकेची मागणी करणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचे एका तरुणीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. या फोटोमध्ये संदीप क्षीरसागर एका मुलीसोबत दारु पिताना दिसत आहे. या व्हायरल फोटोवर संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा तो फोटो मॉर्फ करण्यात आलेला आहे, असं संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मी बोलू नये म्हणून अशाप्रकारे माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विधानसभा निवडणुकीआधी हा फोटो व्हायरल करण्यात आला होता. याबाबत मी पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली आहे. माझ्या पत्नीने हा फोटो बघितल्यानंतर मला प्रश्न विचारला होता, जर राजकारणामध्ये असं कुणाचं वैयक्तिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर कसं करायचं?, पण त्यानंतर ही लोकांनी मला निवडून दिलं आहे आणि मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

आजच्या मोर्चामध्ये सगळ्या राजकीय पक्षाचे लोक सहभागी होणार आहेत. हा राजकीय मोर्चा नाही आणि आमची राजकीय मागणी सुद्धा नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी अटक होत नाहीत, म्हणून लोकात आक्रोश आहे. त्यामुळे हा मोर्चा निघत आहे, असं संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश कमी होणार नाही- संदीप क्षीरसागर

- Advertisement -

मला ज्यावेळी या प्रकरणात लोकांचा मोठा आक्रोश दिसतात त्याचवेळी मी 28 तारखेला मोर्चा काढायचं ठरवलं, होतं असं संदीप क्षीरसागर म्हणाले. मी पहिल्यांदा वाल्मीक कराड याचं नाव घेतलं आणि पोलिसांच्या सीडीआरमध्ये सुद्धा वाल्मीक कराडचे नाव आहे, मग का नाही वाल्मीक कराडला अटक करत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आम्ही या घटनेचा कधीच राजकारण केले नाही.

मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने या प्रकरणाचा तपास लावण्याची घोषणा केली. हे राजकीय प्रकरण नाही, हे गुन्हेगारीचे प्रकरण आहे आणि या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये सगळ्या प्रकारचे लोक उद्या एकत्र येणार आहेत. आज 18 दिवस झाले आहेत या घटनेला वाल्मीक कराड पोलिसांना सापडत नाही, माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश कमी होणार नाही, असं संदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले.

Sandeep Kshirsagar On Beed Case
Sandeep Kshirsagar On Beed Case

Sandeep Kshirsagar On Beed Case

Sandeep Kshirsagar On Beed Case

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *