Samusung कंपनी चा Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोन होणार आहे भारतात लवकरच लाँच! बघा काय असतील स्पेसिफिकेशन्स

By Pravin Wandekar

Published on:

Galaxy S24 FE
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung galaxy S24 FE Launch Soon: प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पदक कंपनी सॅमसंग चा samsung galaxy S24 FE ऑक्टोबर महिन्यात लाँच होण्याची अपेक्षा आहे. सॅमसंगकडून अधिकृत लाँच तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे,या स्मार्टफोन च्या मार्केट मध्ये फोटोज ऑनलाइन लिक झाले आहेत. लीक झालेल्या फोटोज नुसार, नवीन Galaxy S24 FE चा हा स्मार्टफोन मागील मॉडेलसारखा दिसत आहे. या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरे आणि होल पंच डिस्प्ले डिझाइन आहे. सॅमसंग गॅलक्सी S24 FE चे डिझाइन गॅलक्सी S24 आणि मागच्या वर्षीच्या गॅलक्सी S23 FE शी समान दिसते आहे. या स्मार्टफोनच्या पुढच्या बाजूला एक होल पंच डिस्प्ले डिझाइन आहे, ज्यात कमी बेजल्स आणि खालील बाजूस थोडे अंतर आहे.

तसेच पाठीमागील बाजूला, गॅलक्सी S24 FE मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहे, ज्यात कॅमेरा सेंसर्स सरळ लाईन मध्ये आहेत आणि LED फ्लॅश त्यांच्यासोबत आहे. स्मार्टफोनच्या उजव्या कडेला व्हॉल्यूम रॉकर आणि पावर बटण दिसतात. हा स्मार्टफोन पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. गॅलक्सी S24 FE मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले, एक्झीनॉस 2400 चिपसेट, आणि 4,565mAh बॅटरी असण्याची माहिती आहे.अश्याच प्रकारे या स्मार्टफोन मध्ये खूप फीचर्स पाहायला मिळणार आहेत. चला तर मग यातील सर्व अपेक्शित फीचर्स बद्दल माहिती घेऊया.

Samsung galaxy S24 FE Specification

SpecificationDetails
Display6.7-inch AMOLED
ProcessorExynos 2400 SoC
Rear Cameras50MP primary sensor, 12MP ultra-wide camera, 8MP
Front Camera10MP
Battery4,565mAh battery

Samsung galaxy S24 FE Display

Samsung S24 FE या स्मार्टफोन मध्ये 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले असणार आहे, जो 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशन सह येतो. तसेच याचा 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीनवरील वापरला अत्यंत स्मूथ बनवतो, ज्यामुळे गेमिंग आणि स्क्रोलिंग अनुभव चांगला आणि फास्ट होतो. तसेच 1,900 निट्स पर्यंतची पीक ब्राइटनेस या डिस्प्लेला देण्यात आलेला आहे. जो जास्त सूर्यप्रकाशात देखील स्पष्टता प्रदान करतो. त्यामुळे बाहेर उजेडात वापरताना डिस्प्लेवर काहीही दिसण्यात अडचण येत नाही.

Samsung galaxy S24 FE Camera

Samsung S24 FE मध्ये एक चांगला कॅमेरा सेटअप असणार आहे. ज्यामध्ये 10MP चा सेल्फी आणि विडिओ कॉलिंग साठी फ्रंट कॅमेरा दिलेला असणार आहे. तसेच मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे, ज्यामध्ये 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असणार आहे, जो 123° पर्यंतच्या फोटो सह विस्तृत फोटोग्राफीसाठी वापरला येणार आहे. तसेच 50MP वाइड-एंगल कॅमेरा असणार आहे जो उच्च रिझोल्यूशन आणि स्पष्टता प्रदान करेल, तर 8MP टेलीफोटो लेन्स 3x ऑप्टिकल झूमसह तुम्हाला लांबच्या असणाऱ्या वस्तु चा फोटो काढण्यासाठी उपयोगी असणार आहे .असा हा कॅमेरा सेटअप असलेला स्मार्टफोन एका फोटो काढण्याचा छंद असणाऱ्या व्यक्ती साठी खूप चांगला ठरणार आहे.

Samsung galaxy S24 FE Battery

या स्मार्टफोनमध्ये 4,565mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी दीर्घकालीन वापरासाठी पुरेशी आहे. तसेच संगीत प्लेबॅकसाठी बॅटरी 78 तासांपर्यंत टिकते, त्यामुळे तुम्ही जास्त टाइम म्युझिक चा आनंद घेऊ शकता. तसेचा व्हिडिओ प्लेबॅकसाठी बॅटरी 29 तासांपर्यंत टिकते, ज्यामुळे मोठ्या व्हिडिओ सत्रांदरम्यान चार्जिंगची आवश्यकता कमी होते. या बॅटरीच्या क्षमतेमुळे स्मार्टफोन जास्त टाइम चालतो त्यामुळे सारखा सारखा चार्ज करावा नाही.

Samsung Galaxy S24 FE Colors

Android Headlines ने गॅलक्सी S24 FE च्या पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये एक झलक दिली आहे . ज्यामध्ये ब्लॅक,ब्लू , ग्रीन,व्हाईट आणि येल्लो हे कलर्स दाखवण्यात आलेले आहेत. सॅमसंग कंपनीच्या वेबसाइटवर विशेषत उपलब्ध असलेल्या दोन अतिरिक्त रंगाची माहिती देण्याची शक्यता आहे. हे रंग स्थानिक बाजारपेठेनुसार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे हा स्मार्टफोन आपल्या आवडीनुसार हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

गॅलक्सी S24 FE च्या लाँच तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, पण हा स्मार्टफोन लवकरच लाँच होण्याची अपेक्षा आहे.या स्मार्टफोन चे सपोर्ट पेज अलीकडे गुगल वरती लाँच झालेले आहे, त्यामुळे असे संकेत मिळत आहेत की सॅमसंग गॅलक्सी S24 FE लाँच करण्याची तयारी करत आहे. याचा अर्थ सॅमसंग लवकरच या स्मार्टफोनची अधिकृत घोषणा करू शकते.


FAQ

गॅलक्सी S24 FE ची बॅटरी किती क्षमता असलेली असेल?

गॅलक्सी S24 FE मध्ये 4,565mAh क्षमता असलेली बॅटरी असेल.

गॅलक्सी S24 FE मध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम असेल?

गॅलक्सी S24 FE One UI 6.1.1 आधारित Android 14 वर चालेल. यामध्ये Portrait Studio, Circle to Search, Generative Edit, आणि Sketch to Image यांसारखी Galaxy AI वैशिष्ट्ये समाविष्ट असतील.

गॅलक्सी S24 FE मध्ये किती प्रकारचे कॅमेरे असतील?

गॅलक्सी S24 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल,ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, आणि 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूमसह) कॅमेरा असू शकतो.तर सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

1 thought on “Samusung कंपनी चा Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोन होणार आहे भारतात लवकरच लाँच! बघा काय असतील स्पेसिफिकेशन्स”

Leave a Reply