रुपया रसातळाला…. Rupee vs Dollar

Belgaum Belgavkar
3 Min Read

रुपया निच्चांकी पातळीवर

Rupee weakens to record low as dollar extends gains on strong US data

 

Rupee plunges to all-time low, reaches Rs 85 against US dollar

 

US Federal Reserve cut key interest rates by 25 bps : अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीनंतर जगभरातील शेअर बाजारांवर विपरीत परिणाम होत आहे. भारतीय शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला आहे. रुपया प्रथमच 85 च्या खाली घसरला आहे.

चलन बाजारात रुपया 12 पैशांनी घसरला असून एका डॉलरच्या तुलनेत तो 85.06 रुपयांच्या खाली घसरला आहे. याचा थेट सर्वसामान्य लोकांवर परिणाम होणार आहे. चलन बाजारात रुपया एका डॉलरच्या तुलनेत 85.04 वर उघडला आणि 85.07 वर घसरला. गेल्या सत्रात रुपया 84.96 च्या पातळीवर बंद झाला होता. एका डॉलरच्या तुलनेत रुपया 85 च्या खाली घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

- Advertisement -

आयातदारांकडून मागणी वाढल्याने आणि विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारात विक्री करून आपले पैसे काढून घेत आहेत, यामुळे डॉलरची मागणी वाढली आहे, परिणामी रुपया कमजोर होत आहे.

यूएस फेडरल बँकेने 2 दिवसांच्या बैठकीनंतर 18 डिसेंबर रोजी आपलं धोरण जाहीर केले. बँकेने व्याजदरात एक चतुर्थांश टक्के कपात केली. परंतु, त्यांनी 2025 साठी महागाई दराचा अंदाज 2.1 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे की ते 2025 मध्ये फक्त दोनदा व्याजदरात कपात करेल. तर यापूर्वी 4 वेळा कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरली आहे. फेडच्या या निर्णयामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयासह इतर चलने कमकुवत झाली आहेत.

 

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने याचा परिणाम थेट सामान्य लोकांवर होणार आहे. कारण, आयात करण्यासाठी डॉलर हे चनल वापरलं जातं. त्यामुळे आता जिथे पूर्वी 84 रुपये लागत होते, तिथे आता 85 रुपये लागणार आहे. याचा अर्थ आयात केलेल्या वस्तू महाग होतील. भारत खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनांचे भाग अशा कित्येक गोष्टी बाहेरुन आयात करतो. त्यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारताची परकीय गंगाजळी कमी होणार आहे.

#Rupee #Dollar #CurrencyMarket #Forex #IndianEconomy #USFederalReserve #InterestRates #Inflation #MarketImpact #Investment #EconomicNews #RupeeWeakness #DollarStrength #GlobalEconomy #FinancialCrisis #TradeDeficit #ImportCosts #CommodityPrices #StockMarket #EconomicTrends

Rupee weakens to record low as dollar
Rupee weakens to record low as dollar

Rupee weakens to record low as dollar

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *