₹ 80000 रुपये चिल्लर घेवून गेला, पुढे न्यायालयात काय झालं?

Belgaum Belgavkar
2 Min Read

Man pays Rs 80000 alimony to wife with Rs 1 and Rs 2 coins

 

BIZARRE! Man arrives at court with bags of coins to pay alimony worth Rs 2 lakhs to his estranged wife : तमिळनाडूमधील कोईम्बतूर येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका पतीने पत्नीला दिलेल्या भत्त्याच्या रकमेतून ₹ 80000 रुपयांची चिल्लर भरून 20 झोळ्यांमध्ये न्यायालयात नेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वडावल्ली भागात राहणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीने, जो एक टॅक्सी चालक आहे, पत्नीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार २ लाख रुपयांचा अंतरिम भत्ता देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. या आदेशानुसार, बुधवारी तो आपल्या कारमध्ये २ आणि १ रुपयांच्या नाण्यांनी भरलेले २० झोळे घेऊन न्यायालयात पोहोचला.

 

- Advertisement -

 

 

चिल्लर न स्वीकारण्याचा न्यायालयाचा निर्णय

नाण्यांनी भरलेल्या झोळ्यांचा हा प्रकार पाहून न्यायालयाने हा भरणा स्वीकारण्यास नकार दिला. न्यायालयाने संबंधित व्यक्तीस भरणा नोटांमध्ये करण्याचे निर्देश दिले. यानंतर न्यायालयाच्या आवारातून चिल्लर घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

 

गुरुवारी संबंधित व्यक्तीने नोटांच्या स्वरुपात ८० हजार रुपयांचा भरणा केला. न्यायालयाने हा भरणा स्वीकारला आणि उर्वरित १.२ लाख रुपये लवकरच भरण्याचे निर्देश दिले.

 

#Alimony #CourtCase #BizarreNews #CoinPayment #LegalDrama #DivorceSettlement #UnusualPayment #SocialMediaViral #TamilNadu #Coimbatore #TaxicabDriver #JusticeSystem #FamilyLaw #MoneyMatters #DivorceLaw #CourtOrder #StrangeButTrue #FinancialObligations #LegalNews #ViralVideo

Rs 80000 alimony to wife with Rs 1 and Rs 2 coins

Rs 80000 alimony to wife with Rs 1 and Rs 2 coins

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *