बेळगाव : ₹ 20 कोटी भरपाईमुळे चर्चेत आलेल्या शहापूर येथील रस्ता

Belgaum Belgavkar
3 Min Read

बेळगाव—belgavkar—belgaum : ₹ 20 कोटी भरपाईमुळे चर्चेत आलेल्या शहापूर येथील रस्त्यासाठी पुन्हा भूसंपादन करण्याचा ठराव महापालिकेने केला असला, तरी तेथील रस्ता जुन्या सीडीपीनुसार केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे (Comprehensive Development Plans (CDPs)). त्याबाबतचे निवेदन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद व अ‍ॅड. नितीन यांच्याकडून हे निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान, सदर रस्ता तयार करताना रितसर भूसंपादन प्रक्रिया राबविली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी विभागाने जो रस्ता केला आहे, तो रस्ता पुन्हा खुला करण्यास अप्रत्यक्षपणे विरोध करण्यात आला आहे. सदर रस्ता जुन्या सीडीपीमध्ये जेथे होता, तेथून तो केला जाणे आवश्यक आहे; पण तसे न करताना सीडीपी नकाशाचे उल्लंघन करून रस्ता तयार करण्यात आल्याची तक्रार आहे. त्यामुळे जिल्हा पालकमंत्री व जिल्हाधिकारी ही मागणी गांभिर्याने घेणार का? हे पाहावे लागणार आहे.

बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुन्या धारवाड रोडपर्यंत रस्ता तयार करताना सीडीपीचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार निवेदनात आहे. त्यामुळे अनेक कायदेशीर समस्या निर्माण झाल्या आहेत, शिवाय या रस्त्यासाठी बेकायदेशीरपणे काही मिळकती पाडविण्यात आल्याचेही पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. रस्ता तयार करताना रितसर भूसंपादन प्रक्रिया राबविली नसल्यामुळे संबंधिताना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. यामुळे महापालिकेचेही आर्थिक नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

20 कोटी भरपाईचा मुद्दा समोर आल्यानंतर सेव्ह बेळगाव कॉर्पोरेशन या मोहिमेच्या माध्यमातून या रस्त्याच्या निर्मितीमधील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. रस्ता तयार करताना सीडीपीमधील नकाशाचे उल्लंघन झाल्याचेही त्याचवेळी उजेडात आले आहे. चुकीच्या पद्धतीने रस्ता तयार करून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी केल्याचेही समजले आहे. त्यामुळेच ती चूक सुधारण्यासाठी नियमानुसार म्हणजेच सीडीपीनुसार रस्ता तयार केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

नव्याने रस्ता तयार करताना रितसर भूसंपादन केले जावे, त्यासाठी योग्य भरपाई दिली जावी, अशीही मागणी निवेदनात आहे. २०१३ सालच्या भूसंपादन व पुनर्वसन कायद्यातील तरतुदीनुसारच संपूर्ण प्रक्रिया केली जावी, जमीन मालकांना रितसर नोटीस बजावली जावी याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

What are Comprehensive Development Plans (CDPs)? : A CDP is a strategic document crafted by local governments to guide the long-term growth and development of a specific area.

Comprehensive Development Plan (CDP) is a city-level investment plan that reviews the current socio-economic and spatial development of a city
#Belgaum #Belgavkar #ShahapurRoad #Compensation #SmartCity #CDP #RoadDevelopment #LegalIssues #PublicDemand #CommunityAction #Infrastructure #UrbanPlanning #RoadConstruction #GovernmentResponse #CitizenRights #LandAcquisition #LocalGovernment #PublicInterest #Accountability #CityDevelopment Road construction as per old CDP Shahapur

Road construction as per old CDP Shahapur
Road construction as per old CDP Shahapur

Road construction as per old CDP Shahapur

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *