NPS Vatsalya Yojana launch:- २०२४-२५ या वर्षाचा सर्वसाधारण आर्थिक संकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एन.पी.एस. वात्सल्य योजना (NPS Vatsalya Yojana) सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेला आता प्रत्यक्षात उतरवून १८ सप्टेंबर पासून या योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. चला तर मग पाहूया नक्की ही योजना आहे तरी काय आणि यासाठी कसा अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती.
NPS Vatsalya Yojana ची घोषणा नुकतीच २०२४ – २५ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती आणि आता १८ सप्टेंबर पासून या योजनेचा श्रीगणेशा करण्याची घोषणा निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी केली आहे.
कोणत्याही गोष्टीचा पाया भक्कम असेल तर बाकी जडणघडण मजबूत होते म्हणूनच मुलांचा आर्थिक पाया भक्कम व्हावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुलांचा आर्थिक पाया मजबूत करण्याचे उद्दिष्ट या योजने मागे आहे. या कार्यक्रमात अर्थमंत्र्यांसोबत शाळकरी मुलेही सहभागी झाली होती.
NPS वात्सल्य योजना माहिती (NPS Vatsalya Yojana information)
आपल्या मुलांच्या आर्थिक मजबुतीसाठी पालक आपल्या मुलांच्या पेन्शन खात्यात गुंतवणूक करून मुलांच्या भविष्यासाठी बचत करू शकतात. मोठा निधी आणि दीर्घ काळ यासाठी चक्रवाढ पद्धतीचा उपयोग केला जातो शिवाय यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय देण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ अगदी सर्वसामान्य लोकांनाही मिळावा यासाठी यात वार्षिक १०००/- रू. देखील पालक आपल्या मुलाच्या खात्यात जमा करू शकतात असे सांगितले गेले आहे. यामुळे ही योजना सर्वसमावेशक बनली असून आर्थिक सुरक्षेला प्रोत्साहन देणारी ठरली आहे.
सध्याच्या National Pension System म्हणजेच NPS कडून NPS Vatsalya Yojana ही योजना डिझाईन करण्यात आली आहे. या योजनेनुसार पालक आपल्या अल्पवयीन अपत्याचे खाते सुरू करून त्यांच्या रिटायरमेंट फंडमध्ये योगदान देऊ शकतात.
हे खाते पालकांना कोणत्याही महत्त्वाच्या बँका, पोस्ट ऑफिस, नॅशनल पेन्शन फंड तसेच e-NPS च्या माध्यमातून सुरू करता येईल. हे खाते सुरू केल्यावर अल्पवयीन मुलांना पर्मनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर (PRAN) दिला जाईल. मुले सज्ञान झाल्यानंतर या खात्याचे रूपांतर सामान्य NPS खात्यात करण्यात येईल. वयाच्या १८ व्या वर्षानंतर मुले स्वतः हे खाते सांभाळू शकतील. ही रक्कम मुलांच्या निवृत्तीच्यावेळी (Retirement Planning) कामाला येणार आहे.
NPS Vatsalya Yojana गुंतवणूक कालावधी आणि लॉक इन कालावधी
या योजनेत पालक आपल्या मुलांच्या रिटायरमेंट साठी पैसे साठवत असल्याने त्यांना जमेल तसे मुलांच्या १८ व्या वर्षीपर्यंत यात पैसे भरू शकतात. १८ वर्षानंतर या खात्याचे सर्व अधिकार मुलांकडे जातील.
हे खाते तीन वर्ष लॉक इन कालावधीत असेल म्हणजेच या खात्याचा Lock in period तीन वर्षाचा आहे. (3 years lock in period)
जर अचानक काही कारणांमुळे पैश्याची गरज पडली तर तीन वर्षानंतर खात्यात जमा रकमेच्या २५% रक्कम शिक्षण, गंभीर आजार किंवा अपंगत्व यांसारख्या महत्त्वाच्या कारणासाठी काढता येईल. ही रक्कम फक्त तीन वेळाच काढता येईल.
NPS Vatsalya Yojana चे फायदे
- मुलांच्या कमी वयापासूनच मुलांच्या पेन्शनसाठी गुंतवणूक करता येऊ शकते.
- गुंतवणूक दीर्घ काळ असल्याने त्याचा आर्थिक फायदा जास्त होऊ शकतो.
- या योजनेत केलेली गुंतवणूक करात सवलत देते. (Tax rebate)
- ही योजना लवचिक आहे म्हणजेच योजनेचा कालावधी आणि रक्कम तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता.
- हे खाते मुलांच्या नावाने असल्याने वयाच्या १८ वर्षानंतर त्यांना त्या खात्याचे निर्णय घेणे सोपे आहे.
मॅक्स लाईफ पेन्शन फंड मॅनेजमेंटचे सीईओ रणवीर सिंग धारीवाल यांचे वक्तव्य
NPS वात्सल्य योजना अल्पवयीन मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत पालक मुलांसाठी गुंतवणूक करतात. मूल १८ वर्षांचे झाल्यावर ही योजना नियमित राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) रूपांतरित होते.
पालक त्यांच्या अल्पवयीन मुलासाठी एनपीएस खाते उघडून मुलांच्या लहानपणापासूनच जबाबदार पालक असल्याचा पाया घालतात. मुलांना या योजनेची माहिती देऊन ते तारुण्यात बचतीच्या सवयी सुरळीतपणे चालू ठेवण्यास मदत करतात.
who can apply for NPS Vatsalya Yojana
NPS वात्सल्य खाते हे भारतीय नागरिक, NRI आणि OCI सह सर्व पालक आपल्या मुलांसाठी उघडू शकतात.
Process for applying NPS Vatsalya Yojana
- सर्वात आधी नॅशनल पेन्शन सिस्टमच्या https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html या वेबसाइटला भेट द्या.
- मुख्य पेजवर नोंदणी नावाचा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकून नोंदणी करा.
- आधार कार्ड नंबर टाकल्यावर त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
- टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- आलेला OTP टाकून Verify वर क्लिक करा.
- पुढे काही आधार संबंधित माहिती आधीच भरलेली असेल आणि काही माहिती तुम्हाला भरावी लागेल.
- नंतर तुमची सही स्कॅन करून सहीची फोटो प्रत अपलोड करा.
- नंतर पेमेंट करण्यासाठी ज्या पर्यायाने तुम्ही पेमेंट करणार असाल तो ऑप्शन सिलेक्ट करा.
- यानंतर तुमचे NPS खाते तयार झालेले असेल. या खात्याचा अकाऊंट नंबर आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल.