जबरदस्त फीचर्स सह Realme P2 pro 5G लाँच, काय काय आहेत धासु फीचर्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme ही एक नावाजलेली मोबाईल कंपनी आहे आणि या वर्षात अनेक नवे स्मार्टफोन्स लाँच होत आहेत त्यातच Realme देखील मोलाचा वाटा आहे. नुकतेच Realme P2 pro 5G हा नवा आणि खूप छान फीचर्स असलेला मोबाईल भारतात लॉन्च केला आहे. Realme च्या या मोबाईलची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. सध्या बाजारात येणारे नवीन फीचर्सचे मोबाईल आणि त्यांच्या किमती पाहता ग्राहक त्यातून सगळ्यात उत्तम निवडू शकेल इतके पर्याय उपलब्ध झालेले असताना या नावाजलेल्या कंपनीच्या मोबाईलची चर्चा झाली नसती तरच नवल.

कंपनीच्या दाव्यानुसार हा curved display असलेला सर्वात वेगवान मोबाईल आहे. या मोबाईलची अजून एक खास गोष्ट म्हणजे यात व्हीसी cooling technology वापरण्यात आली आहे यामुळे मोबाईल लवकर गरम होण्याची समस्या आता राहणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊया या मोबाईलची संपूर्ण माहिती.


Realme P2 pro 5G Specs

Processor –

  • Snapdragon® 7s Gen 2
  • CPU:4nm Process, Octa-core, Up to 2.4Ghz GPU:Adreno 710

Memory & Storage

  • Up to 12GB+512GB Large Storage
  • RAM:8GB/12GB ROM:128G/256GB/512GB Up to 12GB + 12GB Dynamic RAM
हे हि वाचा -  आता Jio, Airtel चे जाणार नेटवर्क ! BSNL 4G विषयी मोठी अपडेट

Display

  • ize: 6.7 inches (17.02cm) Main screen material:
  • OLED Screen ratio: 93% Resolution: 2412 * 1080 (FHD+) Contrast: 5000000:1
  • Color display: 1.07 billion colors
  • Color gamut: 100% DCI-P3 color gamut Refresh rate: up to 120Hz
  • Touch sampling rate: 240Hz, up to 2000Hz instantaneous sampling rate.
  • Brightness:typical brightness of 600nits,global maximum of 1200nits,local peak brightness of 2000nits,manual maximum of 600nits Brightness adjustment: 20000 levels

Charging & Battery

  • 80W SUPERVOOC Charge
  • 5200mAh (typ) Massive
  • Battery 5050mAh (min) Battery Capacity
  • Includes an 80W Charging Adapter
  • USB Type-C Port

Camera

50MP Sony LYT-600 OIS Camera

  • Sensor size:1/1.95”
  • Resolution 6144×8192
  • Equivalent Focal Length:26mm
  • FOV:79°
  • Aperture:f/1.88
  • Lens:5P
  • Support OIS

8MP Ultra-Wide Camera

  • Equivalent Focal Length:16mm
  • FOV:112°
  • Aperture:f/2.2
  • Lens:5P

32MP Sony Selfie Camera

  • FOV:90°
  • Aperture:f/2.45
  • Lens:5P

Realme P2 pro 5G फीचर्स आणि specifications

Realme P2 pro 5G या मोबाईल मध्ये 6.7 इंच लांबीचा curved display आहे. 240hz इतका या डिस्प्लेचा टच sampling rate आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन ग्लास डिस्प्लेच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसवण्यात आले आहे. या मोबाईलचे अजून एक खास वैशिष्टय म्हणजे यात रेन वॉटर स्मार्ट टच सपोर्ट बसवण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्याला पावसातही मोबाईल वापरता येणार आहे. या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड 14 वर कार्य करणारी आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी यात AI Eye protection फीचर आहे.

Realme P2 pro 5G या मोबाईलमध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामुळे मोबाईलचे सर्व कामकाज सुरळीत राहील.

Realme P2 pro 5G mobile chip set details

यात ग्राफिक्स साठी एड्रेना 710 GPU बसवण्यात आले आहे. यात 2.4 GHz पर्यंतची हाय क्लॉक स्पीड मिळणार आहे.

Realme P2 pro 5G mobile camera

मोबाईलला camera चांगला मिळाला तर चार चाँद लागतात. याही मोबाईलचा कॅमेरा अगदी तसाच आहे. चांगले फोटो येण्यासाठी यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक कॅमेरा 50mp आणि 8mp ची कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी देखील चांगले क्लिक करता यावे यासाठी यात सेल्फी कॅमेरा 32mp देण्यात आला आहे.

हे हि वाचा -  कसाही वापरा न थकणारा HP Laptop आता ५०९९० मध्ये, गेमिंग, एडिटिंग, ऑफिस युज

Realme P2 pro 5G battery

या मोबाईलचे जसे इतर फीचर्स चांगले आहेत तशीच बॅटरी देखील चांगली आहे. यात 5200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80w फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सह येते. ही बॅटरी 0 – 100% चार्ज व्हायला साधारण ४९ मिनिटांचा वेळ लागतो. कंपनीच्या दाव्यानुसार या मोबाईलची बॅटरी चार वर्षानंतर देखील चांगली काम करेल.

त्याचप्रमाणे connectivity साठी यात वायफाय, GPS, dual sim slots, USB C type पोर्ट देण्यात आले आहे.

Realme P2 pro 5G mobile वेरिएशन

कंपनीने या मोबाईल मध्ये तीन वेरिएशन आणले आहेत. स्पेस मधल्या फरकाने हे विभागण्यात आले आहेत.

  1. पहिल्या प्रकारात 8 GB RAM आणि 128 GB ROM म्हणजेच इंटर्नल मेमरी मिळते.
  2. दुसऱ्या प्रकारात 12 GB RAM आणि 256 GB internal memory आहे.
  3. तिसऱ्या प्रकारात 12 GB RAM आणि 512 GB internal memory आहे.

Realme P2 pro 5G mobile price

या मोबाईलची किंमत 21999/- ते 27999/- रुपयांत आहे. तुम्ही किती स्पेसचा मोबाईल निवडता त्यावर किंमत ठरणार आहे.

Variant PriceOffer Price
8 GB RAM + 128 GB StorageRs. 21,999/-Rs. 19,999/-
12 GB RAM + 256 GB StorageRs. 24,999/-Rs. 21,999/-
12 GB RAM + 512 GB StorageRs. 27,999/-Rs. 24,999/-

ऑफर price फक्त दिवाळीच्या आधी पर्यंत valid असेल.
Flipkart वर १७ तारखेपासून या मोबाईलची early bird विक्री सुरू होणार आहे.

Realme P2 pro 5G mobile design

जो टिझर ऑफिशियली लाँच करण्यात आला आहे त्यात हा मोबाईल ग्रीन कलर मध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे मोबाईलच्या front पॅनलवर गोल्डन फ्रेम आणि curve design दिसत आहे. तसेच फोन मध्ये पंच होल cut-out आहे.



FAQ

  1. What’s the Realme P2 pro 5G mobile price range?

    it differs as per veriant. It’s price range is between 21999/- to 27999/- rs.

  2. What are the colour options in Realme P2 pro 5G mobile?

    Parrot Green and Eagle Gray


Leave a Reply