Realme 13 series या तारखेला होणार आहे भारतात लाँच! बघा याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन.

By Pravin Wandekar

Published on:

realme 13
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme 13 series Launch Date: प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी Realme ने त्यांच्या बजेट सिरीज मधील Realme 13 सीरिजचा भारतात 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल हे स्पष्ट केले आहे. लॉन्च ची तारीख व्यतिरिक्त, Realme ने या स्मार्टफोन मध्ये वापरण्यात येणारा चिपसेटही आणि थोडी माहिती जाहीर केलेली आहे, परंतु इतर तपशीलांबद्दल त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. मागील सिरीज प्रमाणे, Realme 13 सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन्स असण्याची शक्यता आहे, ज्यात एक ओरिजनल वेरियंट आणि एक प्लस वेरियंट असू शकतो.

या तारखेला होणार आहे Realme 13 series लाँच

चिनी तंत्रज्ञान ब्रँडने जाहीर केले आहे की ते भारतात 13 series सीरिज लाँच करणार आहे, व हे लाँच 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12:00 वाजता (IST) होईल असे जाहीर करण्यात आलेले आहे. Realme ने त्यांच्या X हँडलवर लाँचच्या बाबतीत टीझर शेअर केलेला आहे. याशिवाय, त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर एक समर्पित मायक्रोसाइट प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये लाँच डेट उघड करण्यात आलेली आहे. इच्छुक ग्राहक नवीनतम अपडेट्स मिळवण्यासाठी साइन अप करू शकतात.तसेच Realme कंपनी कडून सांगण्यात आलेले आहे की 13 5G सीरिज मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy चिपसेट असणार आहे.व 4nm प्रोसेसवर आधारित या नवीन चिपसेटने AnTuTu बेंचमार्कवर 7,50,000 पॉईंट्स मिळवले आहेत, असे सांगितले जाते. या चिपसेटचा दावा आहे की तो मजबूत प्रदर्शन देतो.

Realme 13 series मध्ये दोन स्मार्टफोन असणार आहे ज्यात 13+ 5G आणि 13+ 5G हे दोन स्मार्टफोन असणार आहे.


Realme 13+ 5G मध्ये असु शकतात ही स्पेसिफिकेशन्स

FeatureDetails
Operating SystemAndroid 14-based Realme UI 5
Screen6.67-inch Full-HD+ AMOLED screen
RAM Options6GB, 8GB, 12GB, 16GB
Storage Options128GB, 256GB, 512GB, 1TB
Rear Camera SetupDual: 50 MP primary camera, 2 MP secondary camera
Front Camera16 MP
BatteryInformation not available, but expected to be high-capacity

Realme 13+ 5G च्या मॉडेल नंबर RMX5002 ने चीनच्या TENAA वेबसाइटवर माहिती मिळाली आहे. TENAA ही चीनची सरकारी एजन्सी आहे जी इलेक्ट्रॉनिक स्मार्टफोन च्या प्रमाणपत्रांसाठी माहिती सादर करते. यावरून आपल्याला फोनच्या काही मुख्य तपशीलांची माहिती मिळते.

  • realme 13+ 5g operating system
    या स्मार्टफोन मध्ये Android 14-आधारित Realme UI 5 वापरलेले आहे.तसेच हा स्मार्टफोन Android 14 या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार असेल, ज्यावर Realme UI 5 इंटरफेस असेल. Realme UI 5 Android च्या नवीनतम फिचर्ससह यूजर-फ्रेंडली अनुभव देतो आणि यामुळे स्मार्टफोनच्या कार्यक्षमता सुधारते.
  • realme13+ 5g display
    13+ 5G या स्मार्टफोन मध्ये 6.67-इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले असेल. AMOLED तंत्रज्ञानामुळे स्क्रीनवर चांगले रंग आणि गडद काळ्या रंगाची गडद गुणवत्ता मिळते, तसेच कमी ऊर्जा वापरल्यामुळे बॅटरी जास्त टाइम टिकेल .
  • realme 13+ 5g ram – या फोनमध्ये विविध RAM पर्याय उपलब्ध असतील, ज्यामध्ये 6GB, 8GB, 12GB, आणि 16GB पर्याय असणार आहे. यामुळे वापरकर्ते त्यांच्या आवश्यकतांनुसार आणि मल्टीटास्किंग क्षमतांनुसार योग्य RAM क्षमता निवडता येईल.
  • realme 13+ 5g ram
    या फोने मध्ये स्टोरेजचे चार पर्याय असणार आहे, ज्यामध्ये 128GB, 256GB, 512GB, आणि 1TB उपलब्ध असतील. तसेच मोठ्या स्टोरेज क्षमतेमुळे वापरकर्ते अनेक फोटोज, व्हिडिओज आणि अँप्स सहजपणे यामध्ये वापरू शकतात.
  • realme 13+ 5g camera
    रियलमी च्या या स्मार्टफोन मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी आणि 2 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा फोटो चा फोकस सुधारण्यासाठी आहे. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. ज्यामुळे सेल्फी फोटोज चांगले येतात.
  • realme 13+ 5g battery
    या स्मार्टफोन मधील बॅटरीची खास माहिती अद्याप उपलब्ध नाही, पण 13+ 5G मध्ये मोठ्या क्षमतेची बॅटरी असण्याची अपेक्षा आहे, जी दीर्घकालीन वापरासाठी उपयोगी असेल.

Realme 13 5G मध्ये असु शकतात ही स्पेसिफिकेशन्स

FeatureDetails
Screen6.72-inch LTPS screen, Full-HD+ resolution
RAM Options6GB, 8GB, 12GB, 16GB
Storage Options128GB, 256GB, 512GB, 1TB
Rear Camera SetupDual: 50 MP primary camera, 2 MP secondary camera
Battery4,880mAh
  • realme 13 5g display
    13 5G मध्ये 6.72 इंचाची LTPS (Low-Temperature Poly-Silicon) स्क्रीन असेल, जी फुल-HD+ रिझोल्यूशन सह येते. तसेच LTPS तंत्रज्ञानामुळे स्क्रीनवरील रंग अधिक स्पष्ट आणि चांगले दिसतात, फुल-HD+ रिझोल्यूशनसह, वापरकर्त्यांना चांगल्या गुणवत्तेची आणि स्पष्ट दृश्ये मिळतात.
  • realme 13 5g ram
    13 5G मध्ये विविध RAM पर्याय उपलब्ध आहेत ज्यामध्ये 6GB, 8GB, 12GB, आणि 16GB हे आहेत. विविध RAM क्षमतांमुळे वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार आणि मल्टीटास्किंग नुसार योग्य पर्याय निवडू शकतात.
  • realme 13 5g ram
    या फोनमध्ये स्टोरेजसाठी चार पर्याय उपलब्ध आहेत ज्यामध्ये 128GB, 256GB, 512GB, आणि 1TB हे आहेत. यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात डेटा, फोटोज, व्हिडिओज, आणिअँप्स वापरन्याची सुविधा मिळते, आणि आवश्यकतांनुसार स्टोरेज अपग्रेड करणे सहज शक्य आहे.
  • realme 13 5g ram
    या स्मार्टफोन च्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा उच्च गुणवत्ता फोटोग्राफीसाठी उपलब्ध असणार आहे, तर 2 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा रात्रीच्या वेळेस फोटो काढण्यासाठी उपयोगी आहे आणि पोर्ट्रेट मोडमध्ये अधिक चांगले फोटोस येतात.
  • realme 13 5g battery
    13 5G मध्ये 4,880mAh क्षमतेची बॅटरी असेल. या बॅटरीच्या मोठ्या क्षमतेमुळे फोनला दीर्घकालीन वापरासाठी आणि सतत वापराच्या परिस्थितीत चांगली बॅटरी लाईफ मिळते. यामुळे जास्त वेळा चार्जिंग करण्याची गरज येत नाही.

1 thought on “Realme 13 series या तारखेला होणार आहे भारतात लाँच! बघा याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन.”

Leave a Reply