बेळगाव : नवीन शिधापत्रिका | Apply for Ration Card in Karnataka @कर्नाटक

Belgaum Belgavkar
3 Min Read

Ration Card Application Status 2025

  • ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ
  • https://ahara.karnataka.gov.in
  • The Department of Food, Civil Supplies & Consumer Affairs Govt. of Karnataka

 

 

  • नव्या वर्षात शिधापत्रिकेसाठी अर्ज करता येणार
  • रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

 

BPL ration card in Karnataka is a ration card issued to families living below the poverty line (BPL)

- Advertisement -

Above Poverty Line (APL) ration card is issued to families in Karnataka who live above the poverty line as specified by the state government.

बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : गेल्या काही वर्षांपासून शिधापत्रिका मिळावी यासाठी प्रयत्न करीत असलेल्या नागरिकांना जानेवारी महिन्यापासून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या अनेकांची अडचण दूर होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवीन शिधापत्रिका देण्याचे काम पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची अडचण होत होती.

गोरगरीब, श्रमिक, गरजूंना माफक दरात अन्नधान्य देण्यासाठी साधारण रेशन कार्ड दिले जाते. आपल्याकडे रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत. राज्य सरकारतर्फे नागरिकांचे वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण करून त्या-त्या गटानुसार त्यांना वेगवेगळे रेशन कार्ड दिले जाते. शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड बनविण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीजबिल किंवा पाणी बिल सादर करावे. आपले अर्ज शुल्क भरा. राज्यांनुसार हे शुल्कही वेगवेगळे असू शकते.

रेशन कार्ड हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुविधा केंद्रातून काढता येते किंवा आता ऑनलाइन पद्धतीनेही रेशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा नागरिकांना परवडणाऱ्या किमती चांगल्या गुणवत्तेचे अन्न पुरवण्यासाठी पारित केला होता. एनएफएसए हा कायदा देशातील सर्व राज्यांसाठी दोन प्रकारचे रेशन कार्ड प्रदान करतो. प्रत्येक रेशन कार्ड आणि आधार क्रमांक लिंक करण्यात आलेला आहे.

 

रेशन दुकानातून अनुदानित दरात अन्न पुरवठा मिळवणे. याशिवाय रेशन कार्ड हे सरकारतर्फे दिले जात असल्याने रेशन कार्डचा पुरावा हा संपूर्ण देशात अधिकृत ओळखीचा पुरवा म्हणून ग्राह्य धरला जातो. पॅन कार्डसाठी अर्ज करताना, वाहन परवाना, आधार कार्ड किंवा बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अथवा अन्य कुठेही ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्डला महत्त्व आहे. याशिवाय महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयातील उपचार घेण्यासाठी राज्यातील सर्व रेशन कार्डधारक पात्र आहेत.

सरकारच्या कमी किमतीच्या रेशन योजनेचा (Ration Card) लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका असणे खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे लोक पात्र ठरतात. मात्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Ration Card Application Status 2025

Ration Card Application Status 2025

Ration Card Application Status 2025

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *