पुणे मधील रविवार चा झालेला अक्सिडेंट खुपच चर्चेत आला आहे. या भीषण अपघातामधे पुणे मधील कल्याणी नगर मधे रविवारी पहाटे दोन जणांना आपले प्राण काही चुकी नसताना गमवावे लागले. प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agraval) यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने दारू च्या नशेत पहाटे महागडी गाडी पोर्शे ( porshe) ने १७५ किमी/तास या वेगाने मोटर सायकल वर जात असलेल्या दोघांना धड़क दिली आणि दोघांचा ही जागीच मृत्यु झाला. रस्त्यावरील लोकांनी ही घटना पाहिल्यावर गाडीतील वेदांत अग्रवाल याला चांगलाच चोप दिला आणि गाडी ही तोडून टाकली.
वडिलांना केलि अटक
अल्पवयीन मुलगा वेदांत याचे वडिल विशाल अग्रवाल (Vishal Agraval) हे चार दिवसानी पोलिसांच्या ताब्यात आले, त्यांना पुणे पोलिसांनी छत्रपति संभाजीनगर या ठिकानावारून अटक केलि आहे. कोर्टात हजार केल्यावर विशाल अग्रवाल (Vishal Agraval) यांना तिन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिस पुढील चौकशी करत आहेत, चौकशी दरम्यान विशाल अग्रवाल यांनी या झालेल्या घटनेबद्दल अखेर मोठी कबुली दिली की माझी खुप मोठी चुक झाली की मी वेदांत ला लायसन नसताना गाडी चालवायची परवानगी दिली.
PUNE ACCIDENT CC TV FOOTAGE
जानून घेऊ सर्व घटनाक्रम
- १९ मे २०२४ पहाटे पुणे मधील कल्याणी नगर मधे वेदांत अग्रवाल या १७ वर्षीय तरुणाने पोर्शे गाड़ी चलावत असताना मोटरसायकल वरील दोन जणांना ठोकले, त्यांचा जागीच मृत्यु झाला.
- अपघातात मरण पावलेल्या व्यक्ति, अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी त्यांची नावे असून दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत.
- बाल न्याय मंडल यांनी त्याच दिवशी लगेच त्या आरोपीला जामिन मंजूर केला. आणि शिक्षा म्हणून रस्ते अपघात आणि त्याचे उपाय या विषयावर निबंध लिहायला सांगितल.
- वरील शिक्षा सुनावाल्यावर सोशियल मिडियावर हाहाकार झाला, मोठ्या बापाचा मुलगा म्हणून अशी शिक्षा म्हणत पैसे च वापर करुण प्रकरण दाबले असा बोभाटा झाला.
- अरोपिचे वडिल हे विशाल अग्रवाल (Vishal Agraval) हे रियल इस्टेट कार्यरत आहेत, मिडियावर बोभाटा झाल्यावर आणि राजकारण दबाव यामुले विशाल अग्रवाल ला २१ मे रोजी संभाजीनगर इथून अटक करण्यात आली.
- २२ मे- अरोपिचे वडिल विशाल अग्रवाल (Vishal Agraval) यांना आणि यांच्यासोबत ज्या पब मधे बसून आरोपी दारू पिला होता तेथील दोन कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश गावकर यांना पोलिस कोठडी मधे ठेवण्यात आले.
अरोपिचा जामिन झाला रद्द
आरोपीला प्रथम निबंध लिहिण्याची शिक्षा झाली होती आणि जामिन त्वरित मंजूर करण्यात आला होता. परंतु मीडिया वर झालेल्या बोभात्या मुले आणि राजकीय हस्तक्षेप यामुले याला वेगळ वळन लागले. आरोपी हा बालिक असल्या कारणाने कायद्या नुसार त्याच्या वडिलांना अटक केलि आहे. आणि त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. तसेच आरोपीचा जामिन नामंजूर करुण शिक्षा देण्यात आली आहे.