Pune Car Accident : पुणे येथून चार मित्र कार मधून अक्कलकोट ला देवाच्या दर्शनासाठी चालले होते. कार गरम झाल्यामुळे हायवे च्या कडेला कार उभी करून गाडी थंड करण्यासाठी थांबले आणि दिवसा एका ट्रक ने मागून येऊन त्या उभ्या असलेल्या कार ला धडक दिली. चौघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आणि तिघेजन गंभीर जखमी झाले आहेत.
दिनांक २१/०८/२०२४ रोजी चार मित्र पुण्याहून अक्कलकोट ला देवदर्शनासाठी निघाले. कार जास्त वेळ चालवल्या मुळे गरम झाली. त्यामुळे दुपारी ११.३० वाजता महामार्गावर सिंधुमाई हॉटेल जवळ गाव वखारी येथे गाडी थंड होण्यासाठी थांबवून गाडी महामार्गावरच कडेला लावून गाडीतच थांबले. परंतु नशीब खराब म्हणायला हरकत नाही, एका भरदाव येणारया ट्रक ने पाठीमागून येऊन कार ला धडक दिली. यामुळे गाडीत बसलेल्या पैकी रोहित प्रकाश पोकळे ( वय ३०, राहणार धायरी पुणे) यांचा तेथेच मृत्यू झाला . आणि बाकीचे तिघे म्हणजेच सुरज मधुकर पेटाडे (वय ३१), विजय श्रीनिवास श्रीरसागर ( वय ३३) आणि अजित बोराटे सर्व राहणार पुणे हे जखमी झाले आहेत.
यवत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत, पोलिसांच्या सांगण्यावरून, हे चौघे मित्र त्यांची मारुती सुझुकीची स्विफ्ट कार मधून प्रवास करत होते. ते पुण्यावरून अक्कलकोट ला श्री.स्वामी समर्थ यांचे दर्शन करण्यासाठी निघाले होते. वखारी गावात सी.एन.जि. पेट्रोल समोर आल्यावर कार गरम झाली म्हणून ते थांबले होते. तेवढ्यात एका भरधाव येणाऱ्या ट्रकने मागून येऊन कार ला धडक दिली आणि कार जाऊन समोरील कंटेनर ला धडकली यामुळे हा मोठा अपघात घडला. याबद्दल अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि उपनिरीक्षक उत्तम कांबळे करत आहेत.