1984 लिहिलेली बॅग, भाजपा खासदारावर संतापल्या गांधी

Belgaum Belgavkar
3 Min Read

BJP gifts a tote bag to Priyanka Gandhi with ‘1984’ printed on it

 

BJP MP Carries ‘1984’ Bag To Parliament, Gifts It To Priyanka Gandhi : काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाइन, बांगलादेश आदि मुद्द्यांचा  उल्लेख असलेल्या बॅगा सोबत आणत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अशाच प्रिंटेड बॅगेवरून प्रियंका गांधी आणि भाजपा खासदार आमने सामने आल्याचं दिसून आलं.

Bharatiya Janata Party (BJP) MP Aparajita Sarangi on Friday gifted a bag with “1984” written on it in red to Congress MP Priyanka Gandhi Vadra.

संसदेचं यावेळचं हिवाळी अधिवेशन कमालीचं वादळी ठरलं. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाइन, बांगलादेश आदि मुद्द्यांचा  उल्लेख असलेल्या बॅगा सोबत आणत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अशाच प्रिंटेड बॅगेवरून प्रियंका गांधी आणि भाजपा खासदार आमने सामने आल्याचं दिसून आलं.

 

- Advertisement -

संसदेतील मकर द्वारावर प्रियंका गांधी आणि भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांच्यात खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांनी प्रियंका गांधी यांना 1984 लिहिलेली बॅग देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून प्रियंका गांधी भडकल्या. ‘’हे माझ्यासोबत करू नका’’, असा इशाराही प्रियंका गांधी यांनी यावेळी अपराजिता सारंगी यांना दिला. अपराजिता सारंगी ह्या प्रियंका गांधी यांना जी बॅग देऊ इच्छित होत्या. त्या बॅगवर 1984 लिहिलेले होते. 1984 साली झालेल्या शीख हत्याकांडाशी त्याचा संदर्भ होता.

 

प्रियंका गांधी आणि अपराजिता सारंगी लोकसभेमध्ये प्रवेश करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून, त्यामधून अपराजिता सारंगी यांनी प्रियंका गांधी यांना अचानक बॅग द्यायचे ठरवले होते, असे दिसत आहे. प्रियंका गांधी यांनी सुरुवातीला ही बॅग स्वीकारली. सारंगी यांचे आभारही मानले. मात्र जेव्हा त्यावरील उल्लेख वाचला तेव्हा मात्र त्या भडकल्या. तसेच सारंगी यांना सक्त शब्दात ताकिद दिली.

काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी ह्या पॅलेस्टाईन आणि बांगलादेशबाबत संदेश लिहिलेल्या बॅग घेऊन सभागृहात आल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून अपराजिता सारंगी यांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे.  प्रियंका गांधी ह्या ही बॅग घेऊन जात असनाता सारंगी यांनी त्यांना 1984 हा सुद्धा एक मुद्दा आहे. तसेच तोसुद्धा प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला पाहिजे, असे सांगितले होते.

#BJP #PriyankaGandhi #1984 #AparajitaSarangi #IndianPolitics #Parliament #ToteBag #PoliticalDrama #Congress #ViralVideo #PoliticalGift #Controversy #SikhRiots #BagGift #WinterSession #PoliticalTensions #SocialMediaBuzz #PoliticalSymbolism #PublicReaction #PoliticalTheater

Priyanka Gandhi with 1984 bag
Priyanka Gandhi with 1984 bag

Priyanka Gandhi with 1984 bag

Priyanka Gandhi with 1984 bag

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *