नवीन वर्षाचं गिफ्ट; LPG सिलिंडर झाला स्वस्त

Belgaum Belgavkar
2 Min Read

New Year gift : Price of commercial cooking gas cylinders reduced in country

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. एलपीजी सिलिंडर आजपासून 14 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे. सिलिंडरच्या दरात ही कपात संपूर्ण देशात लागू झाली आहे.

Commercial LPG cylinder prices reduced by Rs 14

Prices for 14.2 kg LPG cylinders remain unchanged

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही

मात्र एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातील ही सवलत फक्त 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी असणार आहे. घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच 14 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आज वर्षाचा पहिला दिवस असून एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. तेल विपणन कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. 1 जानेवारी 2025 पासून दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1804 रुपये, मुंबईत 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1966 रुपये आणि कोलकातामध्ये 1911 रुपये असेल. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना या दर कपातीचा मोठा फायदा होणार आहे.

मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात 16 रुपयांनी घट झाली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1771 रुपयांऐवजी 1756 रुपयांना मिळेल. कोलकात्यात सिलिंडरची किंमत 1980.50 रुपयांऐवजी 966 रुपये झाली आहे. तर पाटण्यात एलपीजी सिलिंडर 2072.5 रुपयांऐवजी 2057 रुपयांना मिळणार आहे.

- Advertisement -

14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1 ऑगस्ट 2023 रोजी शेवटची कमी झाली होती. दिल्लीमध्ये त्याची किंमत 803, कोलकातामध्ये 829, मुंबईमध्ये 802.50 आणि चेन्नईमध्ये 818.50 आहे.

तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सिलिंडरच्या दरामध्ये सामान्य किमतीपेक्षा 200 रुपयांचा फरक आहे. याआधी सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये या सिलेंडरची किंमत सुमारे शंभर रुपयांनी कमी केली होती.
Price of commercial cooking gas cylinders reduced

Price of commercial cooking gas cylinders reduced

Price of commercial cooking gas cylinders reduced

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *