हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. याच्या मदतीने अनेक कामे खूप सोपी झाली आहेत. नुकताच एका तरुणाचा अनुभव सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या तरुणाने ai bot च्या मदतीने रात्रभर झोपेत 1000 नोकऱ्यांसाठी अर्ज केला आणि सकाळी त्याला जे अनुभवायला मिळालं, त्याने सगळ्यांना थक्क करून टाकलं.
ai bot चं वाढतं सामर्थ्य
गेल्या काही काळात AI ने अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणली आहे. नोकरी शोधणे, अर्ज तयार करणे, अगदी कंपन्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे, या सगळ्या गोष्टी AI सहजपणे करू शकतो. AI च्या याच क्षमतेचा वापर करून या तरुणाने स्वतःचा एक ai bot तयार केला. हा ai bot नोकऱ्यांच्या जाहिराती वाचतो, त्यावरून संबंधित नोकरीसाठी योग्य असे सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करतो, आणि नोकरीसाठी अर्ज पूर्ण करतो.
ai bot ने झोपेत केले 1000 अर्ज
या तरुणाने सांगितले की, त्याचा ai bot रात्री भर काम करत होता. झोपेत असताना बॉटने तब्बल 1000 नोकऱ्यांसाठी अर्ज केले. या अर्जांमध्ये प्रत्येक नोकरीसाठी वेगळा आणि त्या नोकरीच्या वर्णनावर आधारित सीव्ही आणि कव्हर लेटर तयार करण्यात आला. परिणामी, सकाळी उठल्यानंतर त्याला 50 हून अधिक मुलाखतींसाठी कॉल आले होते.
कस्टमाइज्ड अर्जांची ताकद
AI बॉटच्या मदतीने तयार केलेले अर्ज पूर्णपणे कस्टमाइज्ड होते. यामुळे अर्ज मानवी भरती व्यवस्थापकांना अधिक आकर्षक वाटले. “प्रत्येक नोकरीसाठी विशिष्टपणे तयार केलेल्या अर्जांमुळे माझे प्रोफाइल नोकरीसाठी पात्र ठरलं. यामुळे कंपन्यांकडून त्वरित प्रतिसाद मिळाला,” असे या तरुणाने सांगितले.
also read -आता लहान मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही | 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना
नवी संधी आणि आव्हाने
AI च्या या क्षमतेमुळे नोकरी शोधण्याची प्रक्रिया वेगवान आणि सोपी झाली आहे. मात्र, यामुळे कंपन्यांवर अर्जांची संख्या हाताळण्याचे मोठे आव्हान देखील उभे राहिले आहे. यापुढे AI कसा वापरायचा यासाठी एक सुसंवाद साधणे गरजेचे आहे, कारण त्याचा वापर योग्य प्रकारे झाला तर तो खूप फायदेशीर ठरू शकतो.
ai bot च्या या यशस्वी प्रयोगाने नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक नवी दिशा दिली आहे, पण यामुळे भविष्यात नोकरीसाठी अर्ज करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होईल, हे निश्चित आहे.