Power Supply Will Be Disrupted Tomorrow
बेळगाव—belgavkar—belgaum : दुरुस्ती कामामुळे रविवार दि. 5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, असे हेस्कॉमने पत्रकाद्वारे कळविले आहे.
बेळगाव तालुक्यात बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतिबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे, मार्कंडेयनगर,हुंच्यानहट्टी, बेन्नाळी, दासरवाडी, जोग्यानट्टी, भुतरामहट्टी, बंबरगा, होसूर, गुग्ग्रानट्टी, वंटमुरी, हालभावी,
होसूर, सुतगट्टी, होनगा, काकती, काकती औद्योगिक वसाहत या भागात सकाळी वीजपुरवठा खंडित होणार आहे.
खानापूर तालुक्यात उचवडे, कुसमळी, बैलूर, मोरब, जांबोटी, कणकुंबी, गवसे, पारवाड, चिगुळे या गावांत वीज खंडित होणार आहे.
Hubli Electricity Supply Company Limited (HESCOM)
हुबळी विद्युत पुरवठा कंपनी लिमिटेड (HESCOM)
Power Supply Will Be Disrupted Tomorrow