लोकप्रिय बाईक बुलेट आता येणार इलेक्ट्रिक मध्ये, Royal Enfield Bullet EV

Admin
2 Min Read
Royal-Enfield-Bullet

Royal Enfield Bullet  ही बाईक आता लवकरच येणार इलेक्ट्रिक मध्ये असे कंपनीकडून जाहीर झाले आहे. बुलेट ही बाईक ३५० सीसी  मध्ये येते. या बाईक चे पेट्रोल व्हेरीएन्ट भारतात खूपच लोकप्रिय आहे. ही बाईक  पेट्रोल मध्ये ३५ ते ४० चे मायलेज देते तसेच रॉयल लोकांची पहिली पसंती म्हणजे बुलेट आहे. आता त्याच ढंगात इलेक्ट्रिक बुलेट बाजारात येत आहे. कंपनी ही गाडी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी रिवील करणार आहे. ग्राहकांना ही गाडी कधी घेत येईल असे काही सध्या तरी जाहीर केलेले नाही. Royal Enfield कंपनीने आपल्या सोशीयल मेडियावर एक छोटा व्हिडिओ टाकला आहे, ज्यामध्ये एक पाराशूटला लटकून एक बाईक खाली येत आहे.  


Royal Enfield Bullet ev
Royal Enfield Bullet ev

काय बदल असतील इलेक्ट्रिक बुलेट मध्ये

पेट्रोल मधील ३५० सीसी बुलेट ही प्रेक्षकांची पसंती आहे. त्यात जर काही मोठे बदल केल्यास बाईक बुलेट राहणार नाही हे कंपणीलाही माहीत आहे. त्यामुळे काही छोटे बदल असणार आहेत. या बाईक मध्ये सिंगल सीट, इंजिन ऐवजी बेटरी , इलेक्ट्रिक मोटर, आलोय व्हील असे काही छोटेसे बदल करण्यात आले आहेत , जे गाडीच्या रेट्रो लुक वर काहीही बदल घडवत नाहीत.

Royal Enfield ईलेक्ट्रिक बद्दल

आतापर्यंत अनेक कंपन्या ईलेक्ट्रिक बाईक मध्ये उतरल्या आहेत, त्यात tvs, ola या कंपनीच्या ईलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईकसला ग्राहकांनी पसंती दिली आहे. परंतु आता एक प्रीमियम बाईक बुलेट या क्षेत्रात पदार्पण करत आहे. Royal Enfield एक स्पॅनिश कंपनी stark future sl सोबत या ईलेक्ट्रिक बाईकवर काम करत आहे. बुलेट सोबतच Royal Enfield Himalaya ही बाईक ही ईलेक्ट्रिक मध्ये येत आहे.



Royal Enfield Bullet ची किंमत किती असणार

तसे तर Royal Enfield Bullet पेट्रोल या बाईक ची ऑन रोड किंमत २३०००० पर्यंत आहे , आणि ही बाईक ३५० सीसी  मध्ये येते. परंतु आता ईलेक्ट्रिक बाईकची किंमत कंपनीने अजून ऑफीशियल जाहीर केलेली नाही. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी ही बाईक लॉंच केल्यावरच या बाईक ची किंमत किती असणार आहे ते कळेल.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *