हंपी येथे उत्खनन सुरु @कर्नाटक

Belgaum Belgavkar
3 Min Read

Hampi Tourism UNESCO World Heritage | Virupaksha Temple Karnataka

 

ASI begins excavation of Hampi’s Pan Supari Bazaar where ‘precious metals were sold’

कर्नाटक—belgavkar—belgaum : जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ अशी ओळख असलेल्या हंपी येथे भारतीय पुरातत्व खात्याने पुन्हा उत्खनन सुरु केले आहे (Archaeological Survey of India (ASI)). विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून इतिहासात अभ्यासलेल्या हंपी येथे आणखी काही अवशेष आढळून येतील, असा विश्वास पुरातत्व खात्याला असल्याने उत्खनन सुरू केले असल्याचे म्हटले जात आहे.

 

Archaeological Survey of India (ASI) officials are excavating the one-kilometre-long Pan Supari Bazaar stretch between Hazara Rama Temple and Shrungarada Hebbagilu (Beautiful Main Entrance) at Hampi in Vijayanagar district.

 

होस्पेट येथील पानसुपारी बाजारपेठेत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने बारकाईने संशोधन कार्य चालविले आहे.

- Advertisement -

 

‘Pedda Angadi Veedhi’ (Big Shop Street) – Vijayanagar – gold and other precious metals were sold during South Indian kingdom

 

evidence of a thriving marketplace at a place which is now known as Pan Supari Bazaar

 

हंपी येथील स्मारकांचा समुच्चय पुढील पिढीने जतन करावा, यासाठी पुरातत्व खाते प्रयत्न करीत आहे. युनोस्कोच्या १९८६ मधील यादीमध्ये हंपी येथील स्मारकांची नोंद आढळून येते. हंपी येथील शिल्पकृतींना जागतिक स्तरावर स्थान असून वर्षभरात २ लाखाहून अधिक विदेशी पर्यटक व ३० लाखांहून अधिक भारतीय पर्यटक हंपीला भेट देत असतात.

 

 

कमलापूर येथील वस्तुसंग्रहालय

मागे काही वर्षांपूर्वी हंपी येथे झालेल्या उत्खननात काही ऐतिहासिक वस्तूंचा शोध लागला होता. या वस्तू कमलापूर येथील वस्तुसंग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकवेळ उत्खनन करून ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्नभारतीय पुरातत्व खाते करीत आहे. हंपीमध्ये ७० च्या दशकातही उत्खनन झाले होते. केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधीक्षक निहिल दास, उपअधीक्षका प्रेमा, अधीक्षक अभियंता भरणीधर यांच्या मार्गदर्शनात सध्या उत्खनन सुरू आहे.

विजयनगर साम्राज्याची अधिक माहिती मिळेल

हंपीमध्ये सध्या सुरू असलेल्या उत्खननाला मोठे महत्त्व आले आहे. यामुळे विजयनगर साम्राज्याची आणखी अधिक माहिती मिळेल, असा विश्वास राज्य पर्यटक मार्गदर्शीचे मुख्य सचिव विरुपाक्षी व्ही. यांनी व्यक्त केला आहे.

प्राचीन वस्तूंचा शोध लागणे शक्य

हंपी येथे सुरू असलेल्या उत्खननामुळे आणखी काही प्राचीन वस्तूंचा शोध लागणे शक्य असून भावी पिढीला इतिहासाचा आणखी खोलात अभ्यास करणे शक्य होईल, असे विजयनगरचे जिल्हाधिकारी एम. एस. दिवाकर यांनी म्हटले आहे.

Hampi was the capital of the Vijayanagara Empire from 1336 to 1565 (as Vijayanagara), when it was abandoned.

#Hampi #HampiTourism #UNESCOWorldHeritage #VirupakshaTemple #Karnataka #ArchaeologicalSurveyOfIndia #PanSupariBazaar #VijayanagarEmpire #HistoricalSites #IndianHeritage #CulturalTourism #ExploreHampi #HeritageConservation #TravelIndia #AncientRuins #TempleArchitecture #VisitKarnataka #IndianHistory #TouristAttraction #HampiExcavation

Pedda Angadi Veedhi Hampi Vijayanagar

Pedda Angadi Veedhi Hampi Vijayanagar
Pedda Angadi Veedhi Hampi Vijayanagar

Pedda Angadi Veedhi Hampi Vijayanagar

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *