Telegram CEO arrested News : सोशल मीडियामध्ये फेसबुक, व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम हे जसे प्रसिद्ध आहेत तसेच telegram देखील प्रसिद्ध आहे. Telegram हे एक व्हॉट्सअँप सारखेच प्रसिद्ध मेसेजिंग ॲप आहे. Telegram चे बरेच चांगले फीचर्स पाहता लोक व्हॉट्सअँप सारखे हेही वापरू लागलेत. काही वर्षांपूर्वी भारतात व्हॉट्सअँप बॉयकॉटची मागणी जोर धरत होती तेव्हा telegram हे एक भारतीय ॲप असल्याचा खोटा दावा करण्यात आला होता.
रशिया, युक्रेन आणि सोव्हिएत रशिया या देशांमध्ये प्रामुख्याने telegram प्रचलित आहे. फेसबुक, व्हॉट्सअँप, इंस्टाग्राम आणि टिकटॉक नंतर telegram हे सर्वात मोठे प्रसिद्ध सोशल मीडिया ॲप आहे. येत्या काळात telegram चे १ अब्ज युझर्स होण्याची शक्यता आहे. असे असतानाही आता telegram सीईओ पावेल डुरोव यांना अटक (Telegram CEO arrested) करण्यात आली आहे.
Telegram कुठे सुरू करण्यात आले होते?
Telegram दुबई येथे सुरू करण्यात आले होते. ते दुबई मध्ये सुरू झाले असले तरीही त्याची स्थापना रशियातील पावेल डुरोव यांनी केली होती. रशियन सरकारसोबत झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी २०१४ मध्ये रशिया देश सोडला होता.
कधी झाली पावेल डुरोव यांना अटक? (Telegram CEO arrested)
Telegram चे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना फ्रान्स पोलिसांनी अटक केली आहे (Telegram CEO arrested). शनिवारी संध्याकाळी पॅरिस विमानतळावर उतरताच त्यांना अटक करण्यात आली. ते पॅरिस जवळ असणाऱ्या बॉर्गेट विमानतळावर स्वतःच्या खाजगी जेटने पॅरिसला गेले होते. बॉर्गेट विमानतळावरच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पावेल डुरोव यांना अटक का करण्यात आली? (Telegram CEO arrested)
मिळालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, प्राथमिक चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. Telegram CEO arrested या अटकेचे कारण म्हणजे telegram वर येणाऱ्या मेसेजवर असलेले कमी नियंत्रण आणि गुन्हेगारी कृत्यांचा वापर करण्यासाठी वापरात आणलेले ॲप हे आहे. या संबंधी telegram ने देखील काहीही माहिती दिलेली नाही तर फ्रान्स पोलिसांनी देखील यावर भाष्य करणे टाळले आहे. मात्र रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अटकेवर प्रश्नचिन्ह उभे करून अटकेची कारणे उघड करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर पाश्चिमात्य देशांतील स्वयंसेवी संस्थांना पावेल डुरोव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
Telegram वर कसला आरोप आहे? (Telegram CEO arrested)
गुन्हेगारी आणि राजकारणासंबंधी चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप यावर आहे. रशियाने जेव्हा युक्रेनवर अतिक्रमण करणे सुरू केले तेव्हा telegram च्या माध्यमातून चुकीचा मजकूर आणि ग्राफिक्स शेअर झाल्याचा आरोप आहे. Telegram माध्यमातून अनेक अनुचित कामे घडली आहेत असाही आरोप आहे.
मोस्कोकडून युद्धासंबंधी बातम्या पोहोचवण्यासाठी telegram चा वापर होत होता. त्याचप्रमाणे युक्रेनचे प्रमुख झेलेन्स्की यांनी telegram चा वापरच संवाद साधण्यासाठी केला आहे. यात बऱ्याच प्रमाणात अनफिल्टर मजकूर शेअर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोण आहेत पावेल डुरोव? (Telegram CEO arrested)
रशियात जन्म झालेल्या ३९ वर्षीय पावेल डुरोव यांनी २०१३ साली telegram ची स्थापना केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, गोपनीयता आणि Encryption याचा पुरस्कार केल्याने अल्पावधीतच telegram ला चांगले यश मिळाले.
२०१४ साली झालेल्या मतभेदांमुळे त्यांना रशिया सोडावे लागले. विरोधकांच्या अकाउंटला telegram वरुन काढून टाकण्यात त्यांना सांगण्यात आले होते पण यासाठी नकार दिल्यामुळे २०१७ मध्ये ते दुबईत राहू लागले आणि २०२१ साली त्यांनी फ्रान्सचे नागरिकत्व स्वीकारले.
पावेल डुरोव यांची संपत्ती किती आहे?
पावेल डुरोव यांच्याकडे १५.५ अब्ज डॉलर्स संपत्ती असल्याची माहिती फोर्ब्सच्या रिपोर्ट नुसार आहे.
Telegram निगडित वाद कोणते आहेत? (Telegram CEO arrested)
Telegram स्थापन झाल्यापासून जगभरातील विविध सरकारांनी ॲपवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला परंतु पावेल डुरोव यांनी तो दबाव झुगारून लावला. त्यांच्या अश्या वागण्यामुळे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याची त्यांची प्रतिमा तयार झाली.
दरम्यान telegram चा वापर गुन्हेगारी दुष्कृत्ये करण्यासाठी होत आहे असा आरोप करण्यात येत आहे. कट्टरपंथीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक telegram च्या Encryption सोबत छेडछाड करून अवैध कामे करत आहेत त्यामुळेच युरोपियन देश विशेषतः फ्रान्स telegram च्या मोड्रेशन धोरणावर टीका करत आले आहे.
सध्या telegram वर ९०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. ते सध्या दुबईत स्थायिक झालेले असले तरीही मूळचे ते रशियन आहेत. त्यांनी २०१४ मध्ये रशिया सोडले असले तरीही त्यांचा मोठा चाहतावर्ग या देशात आहे. फ्रान्स पावेल डुरोव यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे.
FAQ:-
Telegram चे सीईओ कोण आहेत?
पावेल डुरोव (Pavel Durov) हे telegram चे सीईओ आहेत.
Telegram च्या सीईओ ना अटक का झाली?
telegram च्या कंटेंटवर नियंत्रण नसल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली आहे.
सगळ्यात जास्त telegram user कोण आहे?
भारत. भारतात ८७ मिलियन दर महिना active युजर्स आहेत.