angriya cruise – निळेशार पाणी, अथांग समुद्र, वर मोकळे निळे आकाश आणि सोबतीला समुद्राचा मंत्रमुग्ध करणारा आवाज! अहाह! काय मजा येईल ना अश्या वातावरणात फिरायला? सर्वच समुद्र प्रेमी आणि निसर्ग प्रेमींना हे नक्कीच आवडेल. त्यात गोव्याला जाताना असे दृश्य अनुभवायला मिळणार असेल तर? तेही अगदी राजेशाही थाटात? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना हे कसं जमून येईल? चला बघूया हे कसं शक्य आहे ते!
गोव्याला एकदा तरी फिरायला जायचच असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ट्रेन, फ्लाईट्स हे तर प्रवासासाठी पर्याय आहेतच पण आता आंग्रिया क्रुझची (angriya cruise) यात भर पडली आहे. मुंबईला समुद्रकिनारा लाभला आहे आणि त्याचा उपयोग वाहतुकीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे लक्षात घेऊनच ही सेवा सुरू झाली आहे.
समुद्राचा थरार आणि रम्य वातावरण अनुभवत प्रवास करायचा असेल तर नक्कीच या क्रुझने प्रवास करायला हवा. चला तर मग जाणून घेऊया या angriya cruise बद्दल.
आंग्रिया क्रुझ (Angriya Cruise) ही देशातील पहिली सगळ्यात मोठी डोमेस्टिक क्रुझ असून ही मुंबई ते गोवा प्रवास करते. ही क्रुझ १३१ मीटर लांब आणि १७ मीटर रुंद आहे. यात १०४ खोल्या असून यात एक स्वामिंग पूल देखील आहे. यात एकावेळी ३५० लोक प्रवास करू शकतात.
angriya cruise बद्दल
- angriya cruise हे नाव या क्रुझला कसे पडले?
या क्रुझचे नाव ऐकून परदेशी वाटत असले तरीही ते परदेशी नाही तर मराठमोळे नाव आहे. नौदलप्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावावरून आंग्रिया असे ठेवण्यात आले आहे. - angriya cruise कुठे बनली आहे?
ही क्रुझ जपानमध्ये बनलेली आहे. - Angriya cruise ची वैशिष्ट्ये काय आहेत?
जपानमध्ये बनवण्यात आलेल्या या आलिशान क्रुझ मध्ये १०४ खोल्या, दोन अल्पोपहार गृह, बार, छोटासा गोल्फ क्लब, स्विमिंग पूल अश्या सोयी देण्यात आल्या आहेत. साधारण १५ ते १६ तासांच्या या प्रवासात अल्पोपहार, उत्तम जेवण आणि मनोरंजन याची प्रवाशांना मेजवानी मिळेल. या क्रुझ मध्ये असलेली प्रत्येक खोली ही खास पद्धतीने सजवलेली आहे. एवढेच नव्हे तर इतकी राजेशाही असलेली ही क्रुझ पर्यावरण पूरक देखील आहे. या क्रुझवर जलचरांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक देखील ठेवण्यात आलेले आहेत. - सुरक्षेच्या दृष्टीने यात काय काय सुविधा आहेत?
आंग्रिया सी इगल कंपनी आणि मुंबई पोर्ट यांनी ही सेवा सुरू केली असून यात प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यात एकाचवेळी एक हजार लोकांना क्षणात सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काही खास उपकरणे बसवण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात ही सेवा बंद ठेवण्यात येणार असून उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात या सेवेचा आनंद लुटता येणार आहे. - Angriya Cruise चे तिकीट दर काय आहेत? या क्रुझवर सहा गट करण्यात आलेले आहेत त्यानुसार प्रवासाचे दर आहेत. साधारण पाच हजार ते बारा हजार या दरांमध्ये यातून प्रवास करता येणे शक्य आहे.
कशी सजवलेली आहे ही क्रुझ?
आत गेल्यागेल्या पहिले नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाचे एक चित्र आहे. त्यानंतर या क्रुझच्या पॅसेजमध्ये विविध जलचरांचे फोटो, लाईट हाऊस, किल्ले यांचे फोटो लावलेले दिसतील. एक कोकणी टच याला मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. यात असलेल्या खोल्या दोन माणसे, चार माणसे किंवा मोठा ग्रुप अश्या पद्धतीने बनवल्या गेल्या आहेत. एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल इतकी सुंदर व्यवस्था या क्रुझवर आहे. खोल्यांना अटॅच बाथरूम आहेत. खोलीतून बाहेरचा सी व्ह्यू पाहण्यासाठी चांगली मोठी खिडकी आहे. खिडकी असलेल्या रूमचे रेट्स अर्थातच जास्त आहेत.
आपला पश्चिमी, मराठमोळा टच याला मिळण्यासाठी खोल्यांची नावे देखील तशीच ठेवण्यात आलेली आहे. उदहरार्थ:- अर्नाळा.
angriya cruise या क्रुझमुळे काय फायदे होत आहेत?
समुद्रातून फिरण्याचा विलक्षण अनुभव यामुळे मिळत आहे. पर्यटनासाठी याचा खूप फायदा होत आहे. ही क्रुझ राजेशाही थाटात असल्याने बरेच पर्यटक याकडे आकर्षित होत आहेत. आपल्या मुंबईला चांगला समुद्र किनारा लाभला आहे आणि हजारो वर्षांपासून त्याचा वापर वाहतुकीसाठी होत आहे मग या सागरी प्रवासाची मजा लुटत प्रवास करायला कोणाला आवडणार नाही? या विचाराने ही क्रुझ सुरू झाली.
मग तुम्हाला काय वाटतंय तुम्हालाही आवडेल का यात प्रवास करायला?
FAQ:-
Angriya Cruise आता चालू आहे का?
होय. २०१८ पासूनच ही क्रुझ प्रवासासाठी सुरू झालेली आहे.
मुंबई ते गोवा क्रुझची किंमत किती आहे?
आंग्रिया क्रुझची तिकीट किंमत ६६५०/- रू. प्रति व्यक्ती पासून सुरू होते. ही किंमत फक्त एकेरी प्रवासासाठी (one way ticket) आहे.