शेततळ्यात बुडून मृत्यु झालेल्या चार अल्पवयीन मुलांना आर्थिक मदत ( Nirgudsar)  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर (Nirgudsar) या गावामधे दिनांक २४ मे २०२४ रोजी पोहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यु झाला. ही चारही मुले निरगुडसर येथील शाळेत शिकत होती. सध्या गर्मी प्रमाण खुप वाढल्याने उन असह्य होत आहे. ही चारही अल्पवयीन मुले निरगुडसर येथील शेततळ्यात पोहायला गेली होते, शेततळ्याला तारेचे कुंपण केलेले आहे परंतु कुंपण वर करुण ही मुले दोरी बांधून पाण्यात उतरली परंतु दोरी तूटल्याने त्यांना वरती येता आले नाही आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.

शेततळ्यात बुडून मृत्यु झालेल्या मुलांची नावे

दिनांक २४ मे २०२४ रोजी दुपारी तिन वाजता हां दुर्दैवी प्रकार घडला. यामधे श्रद्धा कालू नवले  (वय १२ ), सायली बालू नवले (वय १०), दीपक दत्ता मधे ( वय ७ ), राधिका नितिन केदारी ( वय १३) ही चारही शाळकरी मुलांचा मृत्यु झाला आहे. ही मुले थोरात वस्ति, निरगुडसर (Nirgudsar) येथे रहात होती.

कुणी केलि आर्थिक मदत

मयत मुलांच्या कुटुम्बियाना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, दत्तात्रयनगर ( पारगाव ) यांच्या तर्फे आर्थिक मदत देण्यात आली. सहकार मंत्री श्री दिलीपराव वळसे (Dilip Walse) पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष श्री. बालासाहेब बेंडे (Balasaheb Bende) यांच्या हस्ते प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत देण्यात आली. यावेळी कारखाना संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबले, बाबासाहेब खालकर, रामहरी पोंदे हे उपस्थित होते.  आणि  बेंडे म्हणाले की आम्ही यांना शासकीय मदत मिळन्यासाठी हवी ती मदत करू.

कुणीही राजकारण करू नये

बालासाहेब बेंडे असेही म्हणाले की, शेततळ्यात बुडून मृत्यु झालेल्या मुलांची कुटुंब सध्या तीव्र दुखात आहेत. त्यांचे दुःख आम्ही थोडेसे हलके व्हावे यासाठी १००००० लाख रुपये मदत करत आहोत. दुःख कमी करण्याचा भीमाशंकर सहकारी कराखान्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि अश्या प्रसंगी ही काही लोक वैयक्तिक स्वार्थापोटी राजकारण करत आहेत. हे चुकीचे आहे आणि त्यांनी राजकारण न करता या कुटुंब चे दुखत सहभागी व्हावे ही विनंती. 

हे हि वाचा -  Daughters Day च्या दिवशी आपल्या मुलीला द्या अश्या हटके शुभेच्छा

Leave a Reply