बेळगाव—belgavkar—belgaum : गळतगा : ऊसवाहू बैलगाडीला ओव्हरटेक करुन जात असताना दुचाकीवरून पडलेल्या महिलेच्या डोक्यावरुन चाक गेल्याने महिला ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी गळतगा-भीमापूरवाडी मार्गावरील घडली. मृत महिला हमिदवाडा (ता. कागल, कोल्हापूर) येथील असून प्रियांका कुमार जाधव (वय 34) असे तिचे नाव आहे.
दुपारी 3 च्या सुमारास हमिदवाडा येथील कुमार जाधव व प्रियांका जाधव हे बेडकिहाळ येथील नातेवाईकांच्या घरी जात होते. निपाणी-गळतगा मार्गावरील भीमापूरवाडीजवळ आल्यावर वळणाच्या ठिकाणी प्रियांका दुचाकीवरून खाली पडल्या. त्यावेळी बेडकिहाळ कारखान्याला ऊसवाहू करणाऱ्या बैलगाडीच्या चाकाखाली सापडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तत्काळ भीमापूरवाडीतील नागरिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास थोडा विलंब झाला. निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी सदर महिला मृत झाल्याचे सांगितले.
Nipani Tractor Accident Woman Death Belgaum
Nipani Tractor Accident Woman Death Belgaum