सावधान तुम्हीही येवू शकता आयकर विभागाच्या रडारवर , असे आहेत New rules of banking

Swamini Chougule
5 Min Read
New rules of banking

New rules of banking – आजच्या काळात बँक खाते नसलेला माणूस आपल्याला शोधून सापडणार नाही. अगदी सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते सॅलरी जमा होण्यापर्यंत सगळ्यासाठी बँकेत खाते असावे लागते. तसेच बचत करायला आपले पैसे सुरक्षित ठेवायला आणि कर्ज काढायला देखील बँक खाते लागतेच लागते. याचे नियम सतत काळ परत्वे अपडेट होत राहतात.

बँकेचे व्यवहार प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहेत. अगदी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यापासून ते मोठमोठ्या उद्योजक बँकेत नियमित व्यवहार करत असतात.परंतु त्यांचे बँक खाते करंट प्रकारचे असते. सर्वसामान्य व्यक्तीचे खाते बचत (Saving A/c) प्रकारचे असते असते. त्यात पैसे भरण्यासाठीचे काही नियम असतात. त्यापेक्षा जास्त पैसे भरले तर आयकर विभागाची वक्र दृष्टी तुमच्या बँक खात्यावर पडू शकते. New rules of banking माहिती बँकेत खाते असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असायला हवी.

New rules of banking

आयकर नियमाप्रमाणे तुमच्या बचत खात्यात किती रक्कम असावी, यासंदर्भात काही मर्यादा नाही. परंतु तुमच्या खात्यात अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम आल्यास आयकर विभागाची नजर तुमच्या बँक खात्यावर पडू शकते. तसे बचत खात्यात चेक किंवा ऑनलाइनच्या माध्यमातून एक रुपयापासून, लाख ते कोटिपर्यंत व्यवहार तुम्हाला करता येऊ शकतात.

एका आर्थिक वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम रोकड स्वरूपात भरल्यास बँकेला त्याची माहिती Income Tax Department ला द्यावी लागणार आहे. मग त्या खातेदाराला आयकर विभाला हे उत्पन्न कुठून आले? तुमच्या या उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे.नाही तर तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकता आणि तुमच्या विरुद्ध चौकशी सुरू केली जाऊ शकते आणि त्या चौकशी अंती तुम्ही दोषी आढळल्यास तुमच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाऊ शकते.

50000 रुपयांपेक्षा जास्त रोकड रक्कम तुम्ही जमा करत असाल तर पॅन कार्ड नंबर तुम्हाला द्यावा लागतो. तसेच तुम्हाला एका दिवसात एका लाखाची रोकड जमा करता येऊ शकते.परंतु तुम्ही नियमित खात्यात पैसे जमा करत नसाल तर ही मर्यादा 2.50 लाख रुपये आहे. एका आर्थिक वर्षात तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जास्तीत जास्त दहा लाख रुपये जमा करता येऊ शकतात.जे लोक आयकर रिटर्न भरतात त्या लोकांसाठी ही बँक व्यवहाराची मर्यादा आयकर विभागाने ठरवून दिली आहे.

तुम्ही तुमच्या बँक खात्यात दहा लाख पेक्षा जास्त रक्कम जमा केली आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत तुम्ही दाखवले नाहीत तर खातेदारास जमा रकमेवर साठ टक्के कर,पंचवीस टक्के सरचार्ज आणि चार टक्के सेस लागतो. म्हणजेच तुम्ही तुमच्या बचत खात्यातुन दहा लाखांपेक्षा जास्त रोकड व्यवहार एका आर्थिक वर्षात करू शकत नाही.परंतु तुमच्याकडे उत्पन्नाचे स्रोत असतील तर तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

करंट अकाऊंटमध्ये रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा निश्चित आहे. ही मर्यादा 50 हजार अथवा त्यापेक्षा अधिक आहे. होस्टबुक लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष कपिल राणा यांनी या विषयीची माहिती दिली. त्यानुसार, आयकर नियम 114E अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला खात्यातील उत्पन्न आणि खर्चाचा तपशील देणे बंधनकारक आहे.त्यामुळे करंट अथवा सेव्हिंग खात्यातुन व्यवहार करतान मर्यादा लक्षात ठेवा. बचत खात्यात तेवढीच रक्कम जमा करा किंवा बचत खात्यातून तेवढीच रक्कम काढा जेणे करून तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येणार नाही.

आयकर अधिनियमाच्या कलम 80 टिटीए नुसार सर्व व्यक्तींना, खातेदारांना दहा हजार रुपयांपर्यंत कर सवलतीचा फायदा घेता येतो. व्याजाची रक्कम दहा हजार पेक्षा कमी असेल तर कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही.

बँकिंग आणि फायनान्सच्या जगात, कायदेशीर अनपेक्षित गुंतागुंत टाळण्यासाठी आयकर विभागाने घालून दिलेले नियम समजून घेऊन आपले व्यवहार करणे आवश्यक आहे.बचत खात्यांमध्ये रोख ठेव मर्यादा म्हणजे कर अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून न घेता एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीत जमा करू शकणाऱ्या जास्तीत जास्त रोख रकमेचा संदर्भ देते. ही मर्यादा आयकर नियमांद्वारे रोख व्यवहारांच्या प्रवाहाचे निरीक्षण आणि नियमन करण्यासाठी, मनी लाँड्रिंग, कर चोरी आणि इतर बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराच्या संभाव्यतेवर अंकुश ठेवण्यासाठी सेट केली गेली आहे.

बँकेचे व्यवहार करत असताना आपल्याला या New rules of banking ची माहिती असणे अपेक्षित आहे आणि त्या New rules of banking चे पालन करून आपले आर्थिक व्यवहार करणे आवश्यक आहे. जर तसे झाले नाही तर आयकर विभागाच्या नजरेत तुमचे बँक खाते येते आणि त्यांचा ससेमिरा तुमच्या मागे लागू शकतो.जर हे टाळायचे असेल तर वरील New rules of banking चे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *