हिंदी चित्रपटात गाजलेली Renault Duster परत येणार; लॉन्चिंग पासून ते आत्तापर्यंत पूर्ण झाला आहे एका तपाहून अधिक काळ

Pratiksha Majgaonkar
4 Min Read
Renault Duster

रेनॉल्ट ही एक नावाजलेली कंपनी आहे. या कंपनीच्या गाड्यांनी सगळ्यांच्याच मनात घर केले. हिंदी चित्रपटात या गाड्यांची क्रेझ पाहायला मिळत होती. साधारण 2012 मध्ये Renault Duster ही कार लाँच झाली होती आणि कमी कालावधीत लोकप्रियही झाली परंतु काही कारणास्तव या कारचे उत्पादन भारतात बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा लवकरच नव्या रुपात Renault Duster ही कार भारतीय बाजारपेठेत येणार आहे.

बऱ्यापैकी मोठी आणि दिसायला एकदम क्लासी असलेली ही कार कधी लाँच होणार? आणि काय असतील या कारचे फीचर्स हे आपण या लेखातून पाहूया.

Renault Duster ही कार मोठी असल्याने सहकुटुंब फिरायला जाताना या गाडीचा चांगला वापर होऊ शकतो. भारतात लॉन्च होणारी ही गाडी 7 सीटर असू शकते. ज्यात पाच मोठी माणसे आणि दोन लहान मुले बसू शकतील. यामुळे कदाचित बूट स्पेसवर फरक पडू शकेल. सुट्टीच्या वेळी किंवा सणांना भारतातील बहुतांश लोक सहकुटुंब बाहेर फिरायला जातात त्यामुळे नक्कीच ही गाडी लोकप्रिय होऊ शकते.

मोठा आकार, दमदार व्हील्स, दिसायला एकदम हेव्ही असलेली ही कार इंटरनेटवर लीक झालेल्या फोटोतून बॉक्सी लूकमध्ये असेल हे कळून येत आहे.

- Advertisement -

कसे असेल या कारचे डिझाईन? (Design For New 2024 Renault Duster )

भारतात ही कार बिगस्टर या नावाने लाँच होऊ शकते. या कारचे 7 सिटर व्हेरीयेंट देखील लाँच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गाडीच्या बाहेरील डिझाईनमध्ये बरेचसे बदल केलेले पाहायला मिळतील. या गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे वेगळा दिसत आहे. पुढील भागाला रेनॉल्ट बॅच सह ग्रिल लावण्यात आले आहे. याची लांबी 4343 mm तर व्हील बेस 2657 mm आहे.

Renault Duster

Renault Duster या गाडीतील आतील डिझाईन रोमानियन डेसिया गाडीसारखे आहे. या दोन्ही गाड्यांचे स्टिअरिंग व्हील फक्त वेगवेगळे आहे. समोरच्या पॅनल वर 10.1 इंच टच स्क्रीन multimedia system आहे. त्याचबरोबर 7 इंचाचा उच्च ट्रिममध्ये प्रगत असलेला डॅशबोर्ड आहे.

या गाडीचे लाईट व्ही आकारात असतील.

  • कसे आहे Renault Duster इंजिन?
    यात तीन सिलेंडर आहेत. यात पेट्रोलवर चालणारे 1.0 TCE इंजिन आहे. यात AAMT गिअर बॉक्स आणि manual ची सुविधा असेल. रेनॉल्टचे हे इंजिन चांगले मायलेज देईल.
  • कशी असतील याची चाके?
    या गाडीची चाके अंदाजे 17 ते 18 इंच असू शकतात.
  • सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीत काय काय सुविधा असतील?
    प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या गाडीत सहा एअर बॅग्स देण्यात येतील. त्याचबरोबर EBD, हील असिस्टंट, हील hold आणि अँटी लॉक ब्रेकिंग, तीन पॉइंट सीट बेल्ट अशी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.
  • या नव्या रेनॉल्ट duster ची किंमत किती असू शकेल?
    अंदाजे या नव्या रेनॉल्ट डस्टरची किंमत आठ लाखांपासून पुढे असू शकेल.
  • भारतात Renault Duster कधी लाँच होणार?
    नवीन अहवालानुसार 2025 मध्ये ही कार भारतात लाँच होणार असल्याचे समोर येत आहे.

ही कार बाजारात आल्यावर कोणत्या कार सोबत स्पर्धा होऊ शकते?

2025 मध्ये रेनॉल्ट duster बाजारात आली की Hyundai Creta, Kia Seltos, Volkswagen Taigun, Skoda Kushaq, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder या कार्स सोबत बरोबरीची स्पर्धा करू शकते. जर 7 सीटर कार चा विचार केला तर रिपोर्ट्स नुसार Hyundai Alcazar, Kia Carens आणि MG Hector Plus या कार्स सोबत रेनॉल्टची स्पर्धा होऊ शकते.


FAQ

रेनॉल्ट डस्टर भारतात बंद झाली आहे का?

2022 मध्ये रेनॉल्ट डस्टर भारतात बंद झाली.

भारतातील सर्वात यशस्वी रेनॉल्ट कार कोणती?

रेनॉल्टच्या Kiger, Triber आणि KWID या तीन कार लोकप्रिय आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *