बेळगाव : ‘मि. बेळगाव’ #bodybuilding #विजेता

Belgaum Belgavkar
2 Min Read

बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि स्पोर्टसतर्फे छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत नागेंद्र मडीवाळ ‘मि. बेळगाव’ किताबाचा मानकरी ठरला. रितिक पाटील उपविजेता तर सागर कळीमनी (गोकाक) बेस्ट पोझर ठरला. रुद्र जीमला सांघिक विजेतेपद मिळाले.

 

स्पर्धेचा गटनिहाय अनुक्रमे निकाल असा :
५५ किलो- रौनक गवस, सागर कळीमनी, सुनील जी., नुरेन कटगेरी, अमर सांगलीकर.

६० किलो- उमेश गंगणे, व्ही. के. सागर, आदर्श के., श्रीधर एच., शुभम एम.

- Advertisement -

६५ किलो- रितिक पाटील, जयकुमार, गजानन पाटील, ओमकार पाटील, आकाश हवलकोड.

७० किलो- बसाप्पा के., किशोर पुजारी, सयाजी जी., आदित्य एम., रितेश एच.

७५ किलो- नागेंद्र मडीवाळ, भारत टी., दिग्विजय पाटील, अनंत पाटील, बसवानी जी.

८० किलो महेश गवळी, आकाश एल., हर्ष बी., जोतिबा पाटील, सार्थकपाटील.

८५ हून अधिक गजानन काकतकर, सुजित शिंदे, संदीप एस., प्रतीक बी., मलिक मुजावर.

प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांसह किताब विजेता, उपविजेता व बेस्ट पोझरला पदक, प्रमाणपत्र, भेटवस्तू व बेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष महेश सातपुते, उपाध्यक्ष सुनीला चौधरी, बाबू पावशे, खजिनदार नारायण चौगुले, सहसचिव जितेंद्र काकतीकर, अमित जडे, चेतन तहसीलदार, विजय चौगुले उपस्थित होते. पंच म्हणून सरचिटणीस राजेश लोहार, संयोजन सचिव अनिल आमरोळे, प्रकाश करंजकर, शरीफ मुल्ला, रमेश शेट्टी, रणजीत किल्लेकर, एस. एस. तावडे, राजू पाटील यांनी काम पाहिले.

Nagendra Madiwal in the district level bodybuilding competition

Nagendra Madiwal in the district level bodybuilding competition

Nagendra Madiwal in the district level bodybuilding competition

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *