Ganapati Utsav 2024 – गणेशोत्सव म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा सण. गणपती बाप्पांच्या आगमनाची जशी उत्साहात तयारी सुरू असते आणि वाजत गाजत मिरवणुकीत बाप्पाचे आगमन होते तसेच भावूक वातावरण बाप्पाला निरोप देताना असते. कधी बाप्पा आला आणि हे भक्तिमय दिवस भुर्रकन संपले हे लक्षातही आले नाही. बाप्पाच्या आगमनाची जशी मिरवणूक निघे तशीच निरोप देतानाही निघते याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
देशभरच्या चर्चेचा विषय म्हणजे राजधानी मुंबईतील Ganapati Utsav आणि mumbai ganapati visarjan मिरवणूक! या ganapati visarjan च्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर केली जाते आणि अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून Ganapati Utsav भाविक हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुंबईत दाखल होतात. यामुळेच ganapati visarjan नाच्या दिवशी खूप भाविकांची खूप गर्दी होते. समुद्रकिनारी देखील भाविकांचा मोठा जनसागर बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जमा झालेला असतो. विघ्नहर्ता असलेल्या गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी काही विघ्ने निर्माण होऊ नयेत म्हणून पोलीस अहोरात्र प्रयत्न करत असतात. लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत भाविकांना मनमुराद आनंद लुटता यावा, भक्तिरसात सर्वांनी न्हाहून निघावे यासाठी काही निर्बंध घालून दिले जातात. चांगल्या सणाला कलंक लागू नये यासाठीच हे सर्व प्रयत्न कित्येक दिवस आधीपासून सुरू असतात.
ganapati miravanik आणि ganapati visarjan सुरळीत पार पडावे यासाठी मुंबई पोलीस अहोरात्र काम करतात. विसर्जनाच्या दिवशी काही मार्गांवरची वाहतूक बंद करण्यात येते तर धोकादायक पुलांवरून मिरवणूक जाणार असेल तर काही नियमावली घालून दिली जाते. आता उद्यावर विसर्जन आले असताना पोलिसांनी काही नियम घालून दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर खाजगी बसेस आणि अवजड वाहनांना खालील व्यवस्था करून देण्यात आली आहे.
Ganapati Utsav मध्ये सुरळीत वाहतुकीसाठी अपर पोलीस आयुक्त, वाहतुक, वरळी, मुंबई, अधिसुवना/आदेश क. ११/कायम स्वरूपी / २०२४ / दि. २४/०१/२०२४ अन्वये बृहन्मुंबई मधील सर्व प्रकारच्या खाजगी बसेस आणि अवजड वाहनांना प्रवेश करण्यासाठी आणि त्या मार्गावरून प्रवास करण्यासाठी वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत.
१) सदर निर्बंध हे Ganapati Utsav मध्ये दिनांक ९, १२, १३, १४ आणि १८ तारखेला लागू असतील. हे निर्बंध संपुर्ण बृहन्मुंबईच्या कार्यक्षेत्रासाठी सकाळी ११.०० ते दुस-या दिवशी सकाळी ०८.०० वाजेपर्यंत South Mumbai मध्ये प्रवेश करण्यास आणि रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी बंद असतील.
२) यातून रुग्णवाहिका, पेट्रोलियम उत्पादने, फळे, भाजी विक्रेते, दूध विक्रेते, निम शासकीय वाहने, सरकारी वाहने आणि शाळेच्या बसेस अश्या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या गाड्यांना वरील नियमातून सूट देण्यात आली आहे.
३) Ganapati Utsav मध्ये पार्किंगचा व्यवस्थेबद्दल बोलायचे झाल्यास मुंबईत प्रवेश आणि निर्गमन करणारी सर्व अवजड प्रकारात मोडणारी वाहने, प्रवाशांना घेऊन येणारी किंवा जाणारी बस (सर्व प्रकारच्या खाजगी बस) तसेच वरील सूट दिली गेलेली सर्व अवजड वाहने ही त्यांच्या त्यांच्या खाजगी पार्किंग मध्ये किंवा अधिकृत ‘Pay and Park’ मध्येच पार्क करावीत असे सांगण्यात आले आहे. अश्या वाहनांना ऑन स्ट्रीट पार्किंग करण्यास सक्त मनाई असेल.
मुंबई वाहतूक पोलिसांनी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर केलेली अधिसूचना
मुंबई पोलिसांनी जुन्या आणि धोकादायक पुलावरून मिरवणूक निघताना काय काळजी घ्यावी हे सांगितले आहे. त्यानुसार:-
- १०० पेक्षा अधिक व्यक्ती जुन्या आणि धोकादायक पुलावरून मिरवणुकीसाठी जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- जुन्या आणि धोकादायक पुलावर विसर्जन मिरवणूक थांबवू नये.
- अश्या धोकादायक पुलावर नृत्य करू नये तसेच ध्वनिक्षेपक वापरू नये.
वरील सूचना या खाली नमूद केलेल्या पुलांसाठी आहेत
मध्य रेल्वेवरील धोकादायक पुलांची यादी
- घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज
- करीरोड रेल ओव्हर ब्रिज
- आर्थररोड रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज
- भायखळा रेल ओव्हर ब्रिज
- मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज
पश्चिम रेल्वेवरील धोकादायक पुलांची यादी
- सॅडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये) फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
- केनडी रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)
- फॉकलन्ड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
- बेलासीस, मुंबई सेंट्रल स्टेशनच्या जवळ
- महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रीज
- प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर ब्रीज
- दादर टिळक रेल ओव्हर ब्रीज
राज्याच्या गृह विभागाकडून आधीच जो आदेश जाहीर करण्यात आला होता त्यानुसार काही मार्गांवर अवजड वाहनांना बंदी आणि पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली आहे. गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरळीत पार पडावी आणि मिरवणुकीला निर्माण होणारा अडथळा कमी व्हावा यासाठी काही अधिनियम लागू करण्यात आले आहेत. ganapati visarjan miravanuk 2024 भाविकांची आणि प्रेक्षकांची खूप गर्दी असते. यातच पादचारी, वाहन चालक या गर्दीत अधिक वाढ होते ज्यात अवजड वाहने आणि खाजगी बसेस मुळे आणखी वाढ होऊ शकते.
Ganapati Utsav मध्ये वरील सर्व सूचना पाळून गणपती विसर्जनाची मिरवणूक काढली जावी असे आवाहन करण्यात आले आहे.