डिझेल संपल्याने घात झाला, मुंबई-गोवा महामार्गावर चौघांचा मृत्यू

Belgaum Belgavkar
2 Min Read

Mumbai-Goa Highway Accident

4 Dead, 2 Injured After Towing Van Hits Stationary Car

मुंबई-गोवा महामार्गावर कारला टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रायगडच्या वीर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामधील मृत आणि जखमी हे सर्वजण रायगडच्या महाड येथे राहणारे आहेत. रात्री उशिरा अपघाताची ही घटना घडली आहे. या अपघाताचा तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. डिझल संपल्याने बंद पडलेली स्कॉपिओ कार महामार्गाच्या लगत थांबली होती. याच वेळी पाठीमागून आलेल्या टोईंग व्हॅनने या कारला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

- Advertisement -

सूर्यकांत मोरे, साहिल शेलार (२५ वर्षे), समिप मिंडे आणि प्रसाद नातेकर (२५) असं जागीच मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. हे सर्व महाडच्या कुंभार आळीमध्ये राहणारे होते. तर सूरज नलावडे (३४, रा. चांभार खिंड) आणि शुभम माटल (२६, रा. शिरगाव) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई -गोवा महामार्गावरून हे सर्वजण प्रवास करत असताना हा अपघात झाला.

 

महाडवरून मुंबईला जात असताना वीर रेल्वे स्थानकाजवळ स्कॉपिओ कारचे डिझल संपल्याने कार बाजूला थांबवण्यात आली होती. कारमधून प्रवास करणारे हे 6 जण कारशेजारी उभे होते. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टोईंग व्हॅनने बंद स्कॉपिओला जोरदार धडक दिली.

टोईंग व्हॅनच्या धडकेन स्कॉपिओ कार सुमारे 50 मीटर लांब उडवली गेली आणि सर्व्हीस रोडच्या पलिकडील खड्डयात पडली. अपघातादरम्यान टोईंग व्हॅनने कारजवळ उभे असलेल्यांना जोरदार धडक बसल्याने यामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झालेत.

 

Mumbai-Goa Highway Accident

Mumbai-Goa Highway Accident

 

 

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *