महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी ‛ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महा आर्थिक लाभ मिळणार आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतंत्र करणे हा आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना?
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच केली आहे. या योजने सारखीच योजना मध्यप्रदेशमध्ये ‛लाडली बहना योजना’ नावाने सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक पाठींबा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा ₹ 1500 म्हणजेच वर्षाला ₹ 18000 मिळणार आहेत. तसेच वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. या पैशातून महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्च आणि घरगुती गरजा पूर्ण करता याव्यात हा या योजने मागचा उद्देश आहे.
अर्ज भरण्याची सुरुवात – 1 जुलै 2024
अंतिम तारीख – 31 ऑगस्ट 2024
कोण असतील लाभार्थी महिला?
21 ते 65 वयोगटातील महिला या शासन योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत. त्यात ही खास करून अशा महिलांना लाभ मिळणार आहे
- अविवाहित एकल महिला
- विवाहित
- सोडून दिलेल्या
- विधवा
- निराधार
- घटस्फोटित
लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया चाचपणीसाठी पाठवला
महिला आणि बाल कल्याण विभागाने ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यास पात्र ठरल्या आहेत त्यांच्या बँक खात्यात तांत्रिक तपासणीसाठी एक रुपया पाठवला आहे. पण तांत्रिक तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात रुपया पोहोचला नाही. महिला व बालकल्याण विभागाकडून अशा बँक खातेधारक महिलांशी संपर्क साधण्यात येत आहे असून या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या ‛ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) फॉर्म मागवण्यात येत असून पात्र झालेल्या फॉर्मची तीन शिफ्टमध्ये छाननी करण्यात येत असून पात्र ठरलेल्या अर्जदार महिलांच्या बँक खात्यांची तांत्रिक पडताळणी करण्यात आली आहे. त्यात एक कोटी महिला पात्र ठरल्या असून सगळ्यांच्या खात्यात एक रुपया पाठवला आहे पण 15 ते 16 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्या खात्यांमध्ये पैसे का आले नाहीत? याची तपासणी करून दुरुस्ती करण्यात येणार आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहेत अटी?
- लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- ज्या महिला गरीब आणि गरजू आहेत म्हणजेच ज्या महिलांच्या संपूर्ण कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
- ज्या महिला 18 ते 65 वर्षाच्या आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- ज्या महिलांच्या घरातील सदस्य सरकारी कर्मचारी आणि आयकरदाता नाही अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ज्या महिलांच्या घरात ट्रॅक्टर शिवाय कोणते ही चारचाकी वाहन नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात?
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षांपूर्वीचे (1)रेशनकार्ड (2) मतदान ओळखपत्र (3) जन्म प्रमाणपत्र (4) शाळा सोडल्याचा दाखला.
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
- अर्जदाराचे हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदारचा फोटो
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र/ 15 वर्षांपूर्वीचे (1)रेशनकार्ड (2) मतदार ओळखपत्र (3) जन्म प्रमाणपत्र (4) शाळा सोडल्याचा दाखला
किती तारखेला मिळणार पैसे आणि किती रुपये खात्यात येणार?
राज्य मंत्री मंडळाची तातडीची बैठक बुधवारी या संदर्भात झाली असून पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते 17 ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दोन हप्ते जमा करण्याचा निर्णय झाला आहे म्हणजेच एका हप्त्याचे 1500 रुपये म्हणजे 3000 हजार रुपये 17 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
सांगली जिह्यात ‛ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) 4 लाख 59 हजार 827 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 33 हजारहून अधिक अर्ज अपात्र ठरले आहेत. ते तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.