बेळगाव—belgavkar—belgaum : मुडलगी : भाताला पाणी देण्यावरून शिवारातचं तिघांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन खुनात झाले आहे. सोमवारी पुलगड्डी गावात ही घटना घडली.
रामाप्पा बसवंतप्पा कौजलगी (वय 25) असे मृत व्यक्तीचे नाव असून, सिद्धप्पा मल्लाप्पा कौजलगी (24) हा आरोपी आहे.
सोमवारी दोन जण शेतात पाणी घालत होते. रामाप्पा आणि त्याचे वडील बसवंतप्पा आणि सिद्धप्पा यांच्यात पाण्यासाठी झालेल्या भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले आणि सिद्धप्पाने रामप्पाला त्याच्या हातातील हत्याराने वार करून ठार केले.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गंभीर जखमी झालेल्या बसवंतप्पा यांना गोकाक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रृती, डीवायएसपी मुल्ला, सीपीआय श्रीशैल बकोड, पीएसआय राजू पुजेरी यांनी भेट देऊन गुन्हा नोंदवून तपास केला.
Mudalagi Murder in Farm Land Issue
Mudalagi Murder in Farm Land Issue
Mudalagi Murder in Farm Land Issue