MS Dhoni lands in legal trouble, could be evicted from his Ranchi house
MS Dhoni may get legal notice by Jharkhand State Housing Board for illegal ‘commercial’ activities in Ranchi house
भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings (CSK)) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नवीन संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रांची येथील घरामुळे झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने कॅप्टन कूल धोनीला नोटीस पाठवण्याची तयारी सुरु केली आहे.
MS Dhoni to be THROWN out of his Ranchi home, Housing board set to sent eviction notice
धोनी त्याच्या हर्मू हाऊसिंग कॉलनीतील निवासस्थानाचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करत असल्याच्या आरोपांची Jharkhand State Housing Board ने चौकशी सुरु केली आहे. त्यात हे दावे सिद्ध झाले, तर धोनीला कायदेशीर नोटीस बजावली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
झारखंड सरकारने गिफ्ट डीडद्वारे धोनीला हर्मू हाऊसिंग कॉलनीत 5 कटह जमीन दिली होती. तो पूर्वी मेकॉन कॉलनीचा रहिवासी होता, त्याने त्या प्लॉटवर एक आलिशान घर बांधले होते. पण, नंतर तो सिमालिया येथील फार्म हाऊसमध्ये राहायला गेला. गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष संजय लाल पासवान यांनी सांगितले की, निवासी भूखंडांचा व्यावसायिक उपक्रमांसाठी वापर करण्यास नियमानुसार मनाई आहे. आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. जर आरोप सिद्ध झाले तर धोनीला नोटीस बजावली जाईल.
धोनीला 5000 स्क्वेअर फुटांचा भूखंड मिळाला होता, त्याआधी त्याला दिलेल्या मूळ भूखंडाला लागून ‘कट प्लॉट’ म्हणून आणखी ४७८० स्क्वेअर फूट भूखंड मिळाला होता. धोनी आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणार आहे आणि त्याला फ्रँचायझीने अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटींत करारबद्ध केले.
#MSDhoni #Ranchi #LegalTrouble #JharkhandHousingBoard #EvictionNotice #ChennaiSuperKings #CaptainCool #CricketNews #SportsUpdates #IPL2025 #DhoniHouse #CommercialActivities #HousingBoard #LegalIssues #CricketLegend #IndianCricket #DhoniFans #SportsLaw #RanchiHouse #DhoniEviction
MS Dhoni may get legal notice
MS Dhoni may get legal notice