Mr India Bodybuilding Championship
#bodybuilding
#bodybuilding
57th Junior National Bodybuilding Championship 2024 (IBBF)
बेळगाव—belgavkar—belgaum : पश्चिम बंगालच्या कुचबिहारमध्ये नुकत्याच झालेल्या 57 व्या ज्युनियर मि. इंडिया राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंनी दोन सुवर्णपदक पटकावली. स्पर्धेत 13 राज्यांतील 97 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. पश्चिम बंगालच्या अंकुश गुहाने ज्युनियर मिस्टर इंडिया किताब पटकावला.
कर्नाटक राज्य संघातून खेळताना बेळगावच्या 65 किलो वजनी गटात ऋतिक पाटील आणि 75 किलो वजनी गटात सुजित शिंदे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
कर्नाटक संघातील 60 किलो वजनी गटातील यश हुलने पाचवा क्रमांक मिळवला. कर्नाटक संघाचे नेतृत्व श्रीधर बारटक्के यांनी केले होते.
मास्टर मिस्टर इंडियाचा किताब आसामच्या दिलीप दिओरी यांनी पटकाविला. बेळगावच्या यशस्वी स्पर्धकांना बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
#MrIndia #Bodybuilding #JuniorNationalChampionship #Belgaum #GoldMedal #Fitness #Bodybuilder #Strength #Muscle #Competition #IBBF #Karnataka #BodybuildingLife #FitnessMotivation #Champion #Athlete #BodybuildingCompetition #FitnessJourney #HealthyLifestyle #Powerlifting
Mr India Bodybuilding Championship Belgaum Silver Medal
Mr India Bodybuilding Championship Belgaum Silver Medal