बेळगाव—belgavkar—belgaum : लडाखमध्ये भीषण डोंगर कोसळून बेळगावचा एक जवान शहीद झाला. महेश वाली (वय 25) असे मृत वीर सैनिकाचे नाव आहे. 14 डिसेंबर रोजी लडाखमध्ये भूस्खलनात ऑन ड्युटी सैनिक महेशचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
शहीद झालेल्या जवानाच्या घरी लग्न ठरल्यामुळे आनंदाचं वातावरण होतं आणि घरातील लोकं त्याच्या लग्नाच्या तयारीत होते. परंतू त्याआधीच कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलायं. जवान महेश हा बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील इरणट्टी गावचा आहे. तो जम्मू-काश्मीरच्या लेह सीमा भागात ड्युटीवर होता.
महेश वाली याचे इरणट्टी व अंकलगी येथे शालेय शिक्षण झाल्यावर चार वर्षापूर्वी बेळगाव येथे सैन्यात भरती होऊन प्रशिक्षणानंतर लेह लडाख येथे पोस्टिंग देण्यात आली होती. याचबरोबर त्याचा अलीकडेच साखरपुडा ही करण्यात येऊन फेब्रुवारीत विवाह सोहळा निश्चित करण्यात आला होता.
शहीद जवान महेश यांचे पार्थिव मंगळवारी बेळगावात दाखल झाले, त्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
#Belgaum #Belgavkar #Ladakh #Shaheed #MaheshWali #IndianArmy #BraveSoldier #Hero #Tribute #Condolences #MilitaryService #JammuKashmir #Leh #Gokak #Irontti #Martyr #Respect #Sacrifice #Family #WeddingPlans
mountain collapse in Ladakh Belgaum soldier martyred