बेळगाव—belgavkar—belgaum : भरधाव कँटरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. शनिवारी दुपारी हुदली-रामापूर दरम्यानच्या सेवा रस्त्यावर हा अपघात घडला असून अडव्याप्पा गौडप्पा सुतगट्टी (वय 26, रा. हुदली) असे त्याचे नाव आहे. अपघाताची नोंद मारिहाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.
अडव्याप्पा हा शेतकरी असून तो शनिवारी रामापूरकडून हुदलीकडे मोटारसायकलवरून जात होता तर हुदलीकडून रामापूरकडे सेवा रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कँटरने समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात अडव्याप्पा जागीच ठार झाला.
या प्रकरणी अडव्याप्पाचे वडील गौडाप्पा यांनी पोलिसात फिर्याद दिल्याने मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातानंतर कँटर चालक फरारी झाला असून पोलिसांनी कँटर जप्त केला आहे.
Motorcyclist dies accident Hudli-Ramapur service road