Miraj-Castle Rock Daily Unreserved Express will remain partially cancelled
बेळगाव—belgavkar—belgaum : लोंढा आणि कॅसलरॉक स्थानकांदरम्यानची पॅसेंजर सेवा जानेवारी महिन्यात तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती नैऋत्य रेल्वेने पत्रकाद्वारे केली आहे.
मिरज-कॅसलरॉक ही दैनंदिन पॅसेंजर रेल्वे (क्र. 17333) 1 ते 31 जानेवारी या कालावधीत लोंढास्थानकापर्यंतच धावणार आहे.
तर कॅसलरॉक-मिरज (क्र. 17334) रेल्वे कॅसलरॉकऐवजी लोंढ्यातून सुटणार आहे. क्रमांक 17334 कॅसलरॉक-मिरज दररोज धावणारी पॅसेंजर रेल्वे सुद्धा जानेवारी महिन्यात धावणार नाही, असे नैऋत्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमाडी यांनी कळविले आहे.
#Belgaum #BelgaumRailway #MirajCastleRock #TrainService #RailwayUpdate #PassengerTrain #TrainCancellation #IndianRailways #RailwayNews #TravelUpdate #RailwayAlert #TrainTravel #PublicTransport #RailwaySafety #TravelIndia #TrainJourney #RailwayStation #CommuterAlert #TrainSchedule #RailwayServices