Microsoft देणार भारतात ५ लाख जणांना ai  चे प्रशिक्षण

Admin
2 Min Read
microsoft

Microsoft चे सीईओ Satya Nadella सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी भारतासाठी 3 अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे. या गुंतवणुकीचा उद्देश क्लाउड आणि artificial intelligence (AI) तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हा आहे. कंपनीने 2026 पर्यंत 5 लाख विद्यार्थी, शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि महिला उद्योजकांना AI कौशल्यांसाठी प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील नवोपक्रमांना चालना देण्यासाठी ” ai center of excellence india ” तयार करण्यात येईल.

Microsoft ची महत्त्वपूर्ण भागीदारी

Microsoft ने भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. रेलटेल, अपोलो हॉस्पिटल्स, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा ग्रुप आणि अपग्रेड यांसारख्या कंपन्यांसोबत मिळून AI आणि क्लाउड तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध उद्योगांना नवसंजीवनी दिली जाईल. या भागीदारीमुळे शिक्षण, आरोग्य, आणि शेती यांसारख्या क्षेत्रांमध्ये कामाचा वेग आणि कार्यक्षमता वाढेल. Microsoft च्या फाउंडर्स हब प्रोग्रामद्वारे एआय स्टार्टअप्सना आर्थिक व तांत्रिक मदत दिली जाणार आहे.


also read -जगातील सर्वात उंच ठिकाणी Jio चा पहिला टॉवर : भारतीय शूर जवानांना समर्पित


India Ai सोबत हातमिळवणी

Microsoft कंपनीने India Ai या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या उपक्रमासोबत हातमिळवणी केली आहे. या कराराद्वारे 10 राज्यांमध्ये 20 प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली जातील, जिथे 20,000 शिक्षकांना एआयचे प्राथमिक ज्ञान दिले जाईल. तसेच, विविध भारतीय भाषांसाठी भाषा मॉडेल तयार करण्यात येणार आहे, ज्यामुळे AI उपयोग स्थानिक पातळीवर अधिक परिणामकारकपणे करता येईल. हे मॉडेल शिक्षण, आरोग्य, आणि शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ठोस योगदान देतील.

- Advertisement -

भारताचा AI मध्ये जागतिक आघाडीचा प्रयत्न

Satya Nadella यांनी त्यांच्या भाषणात भारताला जागतिक AI केंद्र बनवण्याच्या दृष्टीने या प्रयत्नांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. एआयमुळे उत्पादकता वाढेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील, आणि देशाचा विकास वेगाने होईल, असे त्यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीमुळे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा आधार मिळणार असून, नव्या संधी आणि विकासाचे दरवाजे उघडणार आहेत.

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *