बेळगाव—belgavkar—belgaum : सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी आणि नवनिर्वाचित आमदारांना त्याची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवारी नागपूर येथे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती समिती नेते रमाकांत कोंडूसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी समिती नेते रमाकांत कोंडूसकर म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे. त्यामुळे त्याठिकाणी जाऊन महाराष्ट्रातील नेत्यांना सीमाभागातील सद्यः परिस्थितीची माहिती दिली जाणार आहे. सोमवारी दुपारनंतर कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होणार आहेत.
रणजित चव्हाण-पाटील म्हणाले, महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन जावे, अशी मागणी सातत्याने कार्यकर्त्यांतून होत होती. याची दाखल घेऊन नागपूरला जाण्याचा निर्णय घेण्यात आला सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी सागर पाटील, महादेव पाटील व प्राचार्य आनंद आपटेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#Belgaum #Maharashtra #Nagpur #Protest #PoliticalMovement #MaharashtraEkikaran #RamakantKonduskar #WinterSession #PoliticalAwareness #BorderIssue #Activism #Leadership #CommunitySupport #Unity #SocialJustice #CivicEngagement #Grassroots #PoliticalChange #LocalLeaders #Empowerment
MES MH Voice
जय महाराष्ट्र बेळगाव निपाणी कारवार भालकी बिदर यांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे.