Mayank Agarwal records 15th century in List A cricket
100 off 45 balls : Discarded India Test opener smashes fifth-fastest Vijay Hazare Trophy century
Mayank Agarwal smashed a 45-ball century, taking Karnataka to a massive win over Arunachal Pradesh in the Vijay Hazare Trophy 2024/25 : कर्नाटक संघाचे नेतृत्व करणारा मयंक अग्रवाल याचा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील शतकी तोरा कायम आहे. देशांतर्गत वनडे स्पर्धेतील चौथ्या फेरीतील अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात कर्नाटकच्या बॅटरनं आपला क्लास दाखवून देत अवघ्या 45 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली.
अल्प धावसंख्येचा पाठलाग करतानाही त्याने शतकी डाव साधला. त्याच्या शतकाच्या जोरावर कर्नाटकच्या संघानं हा सामना 10 गडी राखून जिंकला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या सामन्यात कर्नाटक संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार मयंक अग्रवालचा हा निर्णय गोलंदाजांनी अगदी सार्थ ठरवत अरुणाचल प्रदशेच्या संघाला 43. 2 षटकात अवघ्या 166 धावांवर रोखले होते. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करतना कर्नाटकच्या संघाने 14.2 षटकात म्हणजे 86 चेंडूत सामना खिशात घातला.
मयंक अग्रवालच्या शतकी खेळीशिवाय अभिनव मनोहर याने 41 चेंडूत 66 धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार खेचले. मयंक अग्रवालची शतकी खेळी 7 चौकार आणि 7 षटकारांनी बहरलेली होती.
विजय हजारे स्पर्धेतील मयंकच्या भात्यातून निघलेले हे सलग दुसरे शतक ठरले. याआधी त्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात 139 धावांची कडक खेळी साकारली होती. स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने 47 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुडुचेरी विरुद्धच्या लढतीत 18 धावांवर तो बाद झाला. पण त्यानंतर त्याने धमाकेदार कमबॅक करत पुन्हा एकदा आपल्या क्लास शोनं सर्वांचे लक्ष वेधून घेतली आहे. अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात त्याने 222.22 च्या स्ट्राईक रेटनं धावा कुटल्या.
#MayankAgarwal #VijayHazareTrophy #KarnatakaCricket #Century #CricketHighlights #FastestCentury #CricketWin #DomesticCricket #CricketRecords #ArunachalPradesh #T20Twist #CricketFans #InstaCricket #CricketLife #SportsNews #CricketLovers #MatchWinningKnock #CricketPerformance #BattingMasterclass #CricketCommunity
Mayank Agarwal records 15th century
Mayank Agarwal records 15th century
Mayank Agarwal records 15th century