New Maruti Suzuki Dzire:- मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार असलेली सेडान आता अधिकृतरित्या नवी मारुती सुझुकी डिझायर अखेर नोव्हेंबर महिन्यात लाँच करणार आहे.
आपल्या मायलेज साठी आधीच ओळखली जाणारी मारुती सुझुकी अतिशय लोकप्रिय आणि वाहन उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. आजवर या कंपनीने कार लाँच केली आणि लोकांना ती आवडली नाही असे झाले नाही. या कंपनीकडून लाँच होणारे सगळे मॉडेल लोकप्रिय ठरतात. आता हीच मारुती सुझुकी आपल्या गाडीची थर्ड जनरेशन लाँच करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती.
आता सगळ्यांना Maruti Suzuki Dzire 2024 याच गाडीच्या भारतीय बाजारपेठेत लाँचची प्रतिक्षा आहे. रिपोर्ट्स नुसार आता या गाडीच्या भारतीय बाजारपेठेत लाँच होण्याची तारीख समजली आहे. चला तर मग पाहूया Maruti Suzuki Dzire 2024 भारतात कधी लाँच होणार आणि त्याची वैशिष्टे.
ही नवी Maruti Suzuki एक कॉम्पॅक्ट सेडान आवृत्ती आहे. कंपनीने ही गाडी भारतीय बाजारपेठेत नोव्हेंबर महिन्यात लाँच होऊ शकते असे सांगितले आहे पण अद्याप अधिकृतरित्या याची तारीख समोर आलेली नाही. या नव्या मॉडेलमध्ये कंपनीने बरेच बदल केलेले पाहायला मिळतील तसेच या गाडीच्या सेफ्टीवर कंपनीने विशेष लक्ष दिले आहे.
Maruti Suzuki Dzire 2024 सुविधा
टॅबलेट सारखी 9 इंच size ची इंफोटेंमेंट टचस्क्रीन या नव्या Maruti Suzuki Dzire मध्ये देण्यात आली आहे तसेच यात वायरलेस एपल कारप्ले आणि एंड्रॉयड ऑटो सारखे फीचर्स शिवाय ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल आणि रिवर्स पार्किंग कॅमरा सेंसर या गाडीत मिळू शकतो.
Next Generation Maruti Suzuki Dzire Design
मारुती सुझुकीने सेडानला हॅचबॅकपासून हटके आणि वेगळे दाखवण्यासाठी गाडीच्या बाहेरचा लूक जबरदस्त केला आहे आणि याच्या डिझाइनवर मेहनत घेतली आहे नवीन मारुती सुझुकी डिझायरचे डिझाइन २०२४ च्या स्विफ्टप्रमाणे असले तरीही याचे वेगळेपण जपले आहे. स्विफ्टच्या हनीकॉम्ब ग्रिल ऐवजी नवीन ग्रिल डिझाइन तयार करण्यात आली आहे अशी माहिती Financial Express ने दिलेल्या माहितीनुसार समोर आली आहे.
ऑडीच्या सिग्नेचर बवेरिअन बियर्डची आठवण या गाडीचे डिझाईन पाहून येऊ शकते. एक मस्कुलर बोनट असलेल्या बोल्ड स्ट्रीट स्टांस डोअर या Dzire मध्ये पाहायला मिळत आहे. तसेच Maruti Suzuki ने या गाडीच्या लायटिंग मध्येही बदल केले आहेत.
फ्रंट बम्परमध्ये नव्याने अँगुलर एलईडी हेडलँप आणि एलईडी फोग लँपला पुन्हा डिझाइन करून सेट केले गेले आहे. साइड प्रोफाइलचा एक क्लिअर शोल्डर लाइन, मेटल फिनिश्ड विंडो सिल्स आणि फ्रेश ड्युअल टोन अलॉय व्हिल्ससह यात वेगळा दिसतो तसेच मागील बाजूच्या डिझाइनला एलईडी टेल लँप आणि त्याच्यावर एका मेटॅलिक पट्टी लावली आहे.
Maruti Suzuki Dzire Cabin and Features
या नव्या गाडीत कंपनीने अनेक नवीन फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे आणि नवे फीचर्स देण्यात कंपनी यशस्वी देखील ठरली आहे. या नव्या डिझायरमध्ये सिंगल पॅनल सनरूफ आहे. स्विफ्टप्रमाणे या नवीन डिझायरमध्ये 9 इंचीचे इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, 360 डिग्री कॅमेरा आणि मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्लेचा Analog इस्ट्रुमेंट क्लस्टर असू शकते.
Maruti Suzuki Dzire 2024 Safety Features
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कंपनीने खूप विचार केला आहे आणि चांगले फीचर्स देखील दिले आहेत. या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर या डिझायरमध्ये सहा एअरबॅग, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन लेन्स असू शकतात.
Maruti Suzuki Dzire 2024 Engine Specifications
नवीन डिझायरमध्ये स्विफ्टपेक्षा १.२ लीटर तीन सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असू शकते. हे इंजिन ८० बीएचपी आणि १११.७ एनएमचा टॉर्क देईल आणि दोन ट्रान्समिशन पर्याय सुद्धा देईल. एक ५ स्पीड मॅन्युअल आणि दुसरी ५ स्पीड एएमटी.
Maruti Suzuki Dzire चे स्पर्धक
या कारला 5 स्पीड मॅनुअल आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशन ऑप्शनमध्ये बाजरात आणलं जाऊ शकतं आणि याच्या इंजिनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या सेडानमध्ये 1.2 लीटर जेड सीरीज थ्री सिलेंडर इंजिन दिलं जाऊ शकतं. तसेच या गाडीचे सीएनजी Variant देखील कंपनी आपल्या ग्राहकांसाठी बाजारात आणू शकते. Honda Amaze आणि Tata Tigor ला ही नवी Maruti Suzuki sedan टक्कर देऊ शकते.
FAQ
स्विफ्ट डिझायर CNG मध्ये उपलब्ध आहे का?
S-CNG तंत्रज्ञान डिझायरच्या VXI आणि ZXI प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
डिझायर, सीएनजीचे मायलेज किती आहे?
31.12 kmpl