मे महीना चालु आहे आणि सूर्यदेव खुपच तापलेला दिसतोय. उन्ह्याच्या तडयाखाने नागरिक अक्षरशा हैरान झाले आहेत. दिवस उगवला की कड़क उन्हाला सामोरे जायला लागते त्यामुळ काम नसेल तर घराबाहेर न पड़ने हेच नागरिक करत आहेत. भारतात काही खुप भागामधे तापमान वाढीमुले रेड अलर्ट जारी केला आहे. राजस्थान, दिल्ली, पंजाब अश्या उत्तरे कडील राज्य मधे उन्हाचा तडाखा खुपच वाढला आहे. हवामान खात्याच्या (Mansoon Update )माहितीनुसार येत्या काही दिवसात उष्णता अजुन वाढणार आहे आणि नागरिकांनी सावधान रहावे असे जाहिर केले आहे. तर सध्या भारताच्या दक्षिणेला पाउस पडायला सुरुवात झाली आहे.
कुठे आहे सध्या पाउस
सध्या उन्हाच्या तदाख्याने हैरान झाले आहेत आणि हवामान खात्याने ही सांगितले आहे की मान्सून या वर्षी भारतात लवकर येणार आहे त्यामुले नागरिक मान्सून ची आतुरतेने वाट पहात आहे. तर केरळ मधे मंगळवारी मान्सून जबरदस्त हजेरी लावली आहे. केरळ मधे अनेक भागात जोरदार पाउस झाल्याने उष्णता कमी झाली आहे. नागरिक आनंद व्यक्त करत अहेत. तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार केरळ व्यतिरिक्त काही दिवसातच दक्षिणेकडील कर्नाटक, लक्षद्वीप, तामिळनाडू सह काही राज्यात मान्सून दाखल होणार आहे.
हवामान खात्याचा अंदाज -Mansoon Update
हवामान खात्याने केरळ च्या मान्सून च्या अलर्ट बरोबर हेही जाहिर केले की, उत्तरेकडील राज्य जसे की दिल्ली, चंदिगड़, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणी येत्या २४ तारखेपर्यंत उष्णतेची अजुन तीव्र लाट येण्याची अंदाज आहे. तरी नागरिकांना सतर्क राहून बिन कामाचे घराबाहेर पडू नये असे सांगण्यात आलेले आहे. तसेच महाराष्ट्रमधेही अनेक ठिकाणी, कोकन, गोवा मधेही उष्णता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
काही राज्यामधे उष्णता ४५ अंशाच्या पुढे
तापमान व़ाढमधे सध्या उत्तरेकडील राज्याचे रेकोर्ड झाले आहे. मागील २४ तासामधे भरतपुर, जोधपुर, जयपुर, कोटा आणि बीकानेर च्या अनेक भागांमधे कमाल तापमान ४५ अंश सेल्सियस पेक्षा जास्त नोंदले गेले आहे. त्याचप्रमाणे पिलानी मधे तापमान ४६.६ अंश एवढे नोंदले गेले आहे. आणि हवामान खात्याने हे ही जाहिर केले की या भागंमधे येत्या दोन ते तिन दिवसात अजुन २ अंशाने तापमान वाढन्याची शक्यता आहे.