मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार नाहीच… कारण काय?

Belgaum Belgavkar
3 Min Read

Manmohan Singh Death : Government declares 7-day mourning

Former PM Manmohan Singh’s last rites to be held on Saturday

RIP Manmohan Singh | Last rites of former PM to be held on Saturday : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्यांचं वय 92 वर्षे होतं. देशातल्या आर्थिक सुधारणांचं जनक म्हणून सिंग यांच्याकडे बघितलं जातं. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. काँग्रेसनेही सात दिवसांचा शोक पाळण्याचं जाहीर करत सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शुक्रवारच्याऐवजी शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. गुरुवारी निधन झालेलं असताना शुक्रवारी अंत्यसंस्कार होतील, असं समजलं जात होतं. मात्र शनिवारी अंत्यविधी होणार आहेत. अंत्यविधीसाठी नेमका उशीर का केला जातोय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनमोहन सिंग यांची मुलगी अमेरिकेत वास्तव्याला असते. त्यामुळे त्यांच्या मुली आणि नातेवाईक जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत अंत्यविधी होणार नाहीत. माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या मुलगी अमेरिकेतून भारतात येईल. त्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरु होईल. मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्रीच अमेरिकेतून येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी अंत्यविधी होणार नाहीत. शनिवारी सकाळी ८ ते १० या वेळेत काँग्रेस मुख्यालयात मनमोहन सिंग यांचं पार्थिवदेह अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल.

राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह सर्व मोठे नेते माजी पंतप्रधानांना श्रध्दांजली अर्पण करतील. त्यानंतर काँग्रेस मुख्यालयातूनच अंत्ययात्रेला सुरुवात होईल. माहितीनुसार, राजघाटाजवळ माजी पंतप्रधानांचं अंत्यसंस्कार होतात, तिथेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. अंत्यविधीच्या सर्व प्रक्रियेमध्ये सरकारदेखील सहभागी आहे. काँग्रेसकडून मनमोहन सिंग यांच्यावरील अंत्यविधीसाठी सरकारकडे जागेची मागणी होऊ शकते.

- Advertisement -

मनमोहन सिंग यांच्याविषयी…
जन्मतारीख आणि स्थळ २६ सप्टेंबर १९३२, गाह, पंजाब.
वडील आणि आई – गुरूमुखसिंग आणि अमरीत कौर.
शिक्षण – एम. ए. अर्थशास्त्र, पंजाब विद्यापीठ, चंडीगड. विद्यापीठात प्रथम क्रमांक. केंब्रिज विद्यापीठातून प्रथम श्रेणीतून अर्थशास्त्राची पदवी. ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूफिल्ड महाविद्यालयातून डी फिल.
पत्नी – गुरुशरण कौर, उभयतांना तीन मुली आहेत.

भूषवलेली पदे… :
देशाचे तेरावे पंतप्रधान
२२ मे २००४ ते २६ मे २०१४.

राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते
२१ मार्च १९९८ ते २१ मे २००४.

केंद्रीय अर्थमंत्री
२१ जून १९९१ ते १६ मे १९९६.

नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष
१५ सप्टेंबर १९८२ ते ३१ ऑगस्ट १९८८०
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर
१५ सप्टेंबर १९८२ ते १५ जाने…. १९८५.

Manmohan Singh Death
Manmohan Singh Death
Manmohan Singh Death

Manmohan Singh Death

 

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *