मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात, Manasi Naik आता जाणार पॅरिस ला रहायला

By Swamini Chougule

Published on:

manasi naik
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mansi Naik falls in love again : आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतली एक फेमस अभिनेत्री सध्या चर्चेत आहे ती त्याच्या घटस्फोटाबरोबरच ती पुन्हा प्रेमात पडल्याच्या बातमीमुळे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे Manasi Naik ही देखणी अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे.

Manasi Naik हिने अनेक डान्स शो गाजवले आहेत तर काही डान्स शो मध्ये जज्ज म्हणून काम केलं आहे. तिला ओळख मिळाली ती ‛ वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या तिच्या गाण्याने. त्यानंतर ‛ बाई वाड्यावर या’ ‛आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं’ आणि काही आयटम सोंग्सनी तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं.

ती सध्या तिच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. मानसी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कायमच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने या आधी तिच्या नवऱ्याबरोबरचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

मानसी नाईकने घेतला घटस्फोट (Mansi Naik got divorced)

Manasi Naik आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न 19 जानेवारी 2021 मध्ये मोठ्या धुमधडाक्यात झाले होते.त्याआधी हे दोघे काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदीप कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचे.अनेक वेळा ते एकमेकांनाबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असत.पण दुर्दैवाने त्यांच्या दोघांच्या नात्यात दुरावा आला. दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचा घटस्फोट ही झाला आहे पण Manasi Naik पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा सुरू आहे.

काय म्हणाली मानसी नाईक?

Manasi Naik ने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात तिला काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्याची तिने उत्तरं दिलीच पण तिने तिचे करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल दिल खुलास गप्पा देखील मारल्या. यावेळी ती म्हणाली,

‛आता अट्टाहासाने पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. तोही प्रवास आता स्त्री म्हणून मला जगायचा आहे. हा जो काही माझा जन्म आहे. तो मी कदापि वाया घालवणार नाही. हे मी माझ्या मनाची पक्के ठरवले आहे. कोण म्हणतं अडचणी येत नाहीत. त्यांना हाय हॅलो आणि बाय करायचं असतं.’

पुढे तिला प्रेम म्हणजे काय असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली,
‛ प्रेम खूप छान असतं.माझ्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचे आहे.जगात अशा खूप गोष्टी आहेत,ज्यावर तुम्ही प्रेम करू शकता. मी स्वतःच्याच प्रेमात पडली आहे”

कोण आहे Manasi Naik चा नवीन बॉयफ्रेंड?

घटस्फोटानंतर मानसी नाईकने पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची कबुली तिने सोशल मिडिया दिली. तिने काही दिवसांपूर्वी पॅरिसमधील तिच्या बॉयफ्रेंडबरोबर काही खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले होते

‛ पॅरीसियन जादू….क्षणांना आठवणींमध्ये बदललं.’

फोटोमध्ये बॉयफ्रेंडबरोबर अभिनेत्री आनंदी दिसत आहे. मानसीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चाहते देखील तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी मानसीला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सांगायचं झालं तर मानसी नाईकने या पूर्वी सोशल मीडियावर तिच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती. पण मानसीने बॉयफ्रेंडचे नाव सांगितले नव्हते. आता तिने बॉयफ्रेंडबरोबर फोटो पोस्ट करत त्याला टॅग देखील केले आहे. अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे राहुल खिस्मतराव!

तुम्हाला माहित आहे का मानसी नाईक पडली पुन्हा प्रेमात

कोण आहे हा राहुल खिस्मतराव? (Who is rahul khismatrao?)

मानसी नाईक हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे राहुल खिस्मतराव खूपच चर्चेत आला आहे. सध्या राहुल याचे मानसी बरोबरचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.राहुल हा अंतराळ शास्त्रज्ञ आहे. महत्त्वाचे म्हणजे मानसी नाईक देखील जर्मनी इथे स्थाईक होणार असल्याची माहिती तिने दिली आहे.

बॉयफ्रेंडबरोबर पॅरिसमध्ये वाढदिवस

या वर्षीचा तिचा वाढदिवस मानसीने पॅरिसमध्ये तिच्या बॉयफ्रेंडबरोबर साजरा केला. तो कसा साजरा केला या विषयी तिने सांगितलं. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला आयफेल टॉवरच्या इथे नेण्यात आले होते. तसेच तिला राहुलने फोसिल वॉच बर्थडे गिफ्ट म्हणून दिले आहे. त्यामुळे तिला तिच्या आयुष्यातील या खास व्यक्ती विषयी विचारले. तेंव्हा तिने खास व्यक्ती विषयी भाष्य करताना म्हणाले होते. मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचे नाव मी लवकरच गुलदस्त्यातुन बाहेर काढेन. पण,बरं वाटलं की असा कोणीतरी आहे जो तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायला काहीही करू शकतो.

Manasi Naik ही अभिनेत्री तिच्या डान्समुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या ही खूप मोठी आहे.चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ टाकत असते. चाहते देखील तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. एकूण काय मानसी नाईकच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आले आहे. आणि ही अभिनेत्री खूप आनंदात आहे.

Leave a Reply