या वर्षीच्या गणपतीला अश्या प्रकारे करा बाप्पाची सर्व तयारी – all the preparations this year Ganpati bappa

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संपूर्ण भारतात आणि अगदी भारताबाहेरही गणेशोत्सव (Ganpati bappa) मोठ्या उल्हासात साजरा केला जातो. गणपती बाप्पा मोरया या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमत असतो. टाळ, मृदुंगांचे आवाज, आरत्यांचा सुरेल ध्वनी आणि एक प्रसन्नता वातावरणात जाणवत असते. मुंबईतील चाकरमानी लोक आवर्जून गणपतीसाठी गावी जातातच. सगळ्यांचेच लाडके आणि आराध्य दैवत असलेल्या गणेशोत्सवात भक्तगण अगदी तल्लीन झालेला असतो. घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होते. सजावट, प्रत्येक दिवशी काय खास बेत करायचा हे अगदी महिनोन्महिने आधी ठरवले जाते आणि मग स्वागताची जय्यत तयारी झाल्यावर आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन होते.

या सगळ्यात एक प्रश्न असतो तो म्हणजे गणेश स्थापनेचा मुहूर्त काय?, पूजेची तयारी कशी करावी? आणि बारीकसारीक गोष्टी राहून जाऊ नये म्हणून काय करायचे? तर तुमचा हाच प्रश्न आज आपण दूर करणार आहोत. चला तर पाहूया २०२४ मधील गणेशोत्सवात शुभ मुहूर्त काय आहेत? आणि कशी करायची आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना.

यंदा गणेश चतुर्थी कधी आहे?

आपल्या हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणले जाते. २०२४ मध्ये शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.

मूर्ती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त काय आहे?

गणेश मूर्ती स्थापनेसाठी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होईल ते दुपारी ०१ वाजून ३४ मिनिटापर्यंत हा मुहूर्त असेल. म्हणजेच या वेळेत गणेश मूर्तीची स्थापना केल्यास ते चांगले फलदायी असेल.

हे हि वाचा -  बिग बॉसमुळे पुन्हा प्रकाश झोतात आलेल्या Varsha Usgaonkar यांचा कठीण जीवनप्रवास

गणेश (Ganpati bappa) स्थापना कशी करावी?

सकाळी लवकर उठून प्रातर्विधी आटपून शुचिर्भूत होऊन सोवळ्यात गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी तयार व्हावे. पूजेची जागा स्वच्छ करून चौरंग किंवा पाटावर Ganpati bappa मूर्ती स्थापेसाठी ठेवावी. मूर्तीचे तोंड दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्यावी. पाटावर पिवळ्या किंवा केशरी रंगाचे रेशमी वस्त्र अंथरावे.

मूर्ती स्थापन करताना गणेश आव्हान करावे. जेव्हा आपण घरी Ganpati bappa ची मूर्ती आणतो तेव्हा ती फक्त मूर्ती असते पण योग्य पद्धतीने केलेली पूजा त्यात देवत्व आणते असे सांगितले जाते. म्हणूनच आपण आणलेली मूर्ती फक्त मूर्ती न राहता त्यात देवत्व येण्यासाठी आव्हाहन केले जाते. षोडशोपचारे केलेली ही पूजा त्यात देवत्व आणते.

पहिल्या दिवशी यथासांग पद्धतीने गणेश स्थापना झाली की रोज सकाळी नियमित पूजा करावी. आपल्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार सकाळ, संध्याकाळ आरत्या घ्याव्यात.

Ganpati bappa पूजेच्या आधी काय पूर्वतयारी करावी?

सजावट तर प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार करतोच. त्यानंतर चौरंग, पाट, त्यावर अंथरायला स्वच्छ रेशमी वस्त्र तयार ठेवावे.

पूजेच्या तबकात अक्षदा, हळद – कुंकू, गुलाल, बुक्का, जानवी जोड, अष्टगंध, सुपारी, विड्याची पाने, सुट्टे पैसे (विड्यावर ठेवण्यासाठी), फळे, दूध साखर आणि पंचामृत, शुद्ध पाणी, पळी, ताम्हण, कलश, पंचपात्र, घंटा, दुर्वा, हार, फुले, अत्तर, वस्त्र, कापसाची वस्त्रमाळ (गेजवस्त्र), निरांजन, गूळ खोबरे हे सर्व तयार ठेवावे.

नैवेद्यासाठी माव्याचे मोदक किंवा पेढे ठेवावेत. दुपारी जेवणाच्या वेळी २१ उकडीच्या मोदकांचा नैवेद्य, वरण – भात आणि भाजी असा संपूर्ण नैवेद्य अर्पण करावा.

गणेशोत्सवा दरम्यान काय काळजी घ्यावी?

जेव्हा आपण मूर्ती घरी आणतो तेव्हा ती नीट असल्याची खात्री करून घ्यावी. जर काही कारणाने मूर्ती भंगली किंवा कुठे तडा गेला तर अजिबात न घाबरता त्या मूर्तीचे विसर्जन करून दुसरी मूर्ती आणावी.

हे हि वाचा -  गेमर्स साठी गुड न्यूज ViewSonic VX2758A 2K PRO 3 गेमिंग मॉनिटर भारतात लाँच

एकदा मूर्तीची प्रतिष्ठापना झाली की मूर्तीला सारखा सारखा हात लावू नये. पूजा करताना शुचिर्भूत होऊन सोवळ्यात पूजा करावी.

मनोभावे पूजा करावी. कोणत्याही देवाला आपले मनापासून केलेले प्रयत्न भावतात आणि मनोभावे सर्व काही केले की तो आपल्याला पावतोच त्यामुळे जितके शक्य होईल तेवढेच करावे परंतु मनोभावे करावे.

Ganpati bappa बाप्पा जोवर घरी आहे तोवर सात्विक आहार घ्यावा.

घरात भक्तिमय वातावरण राहील याची काळजी घ्यावी. क्लेश, वाद होणार नाहीत याची आवर्जून काळजी घ्यावी.

Ganpati bappa ची मूर्ती शक्यतो मातीची किंवा कागद्याच्या लगद्याची असावी. यामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होत नाही आणि विसर्जनाच्या वेळी आपल्या मनोभावे पुजेलेल्या बाप्पाच्या मूर्तीची अवलेहनही होत नाही.

गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये याची कथा काय आहे?

पौराणिक कथेनुसार Ganpati bappa आपल्या वाहन मुषकावरून कैलासावर फेरफटका मारत होते. त्यांच्या लंबोदरामुळे चंद्र त्यांच्यावर हसू लागला. असे उपहासाने आपल्याला हसलेले Ganpati bappa ला आवडले नाही. याबद्दल त्यांनी चंद्र देवाला जाब विचारला पण त्यांचे हसू काही बंद होईना. शेवटी बाप्पाला राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला. या शापामुळे दिवसेंदिवस चंद्राचा क्षय होऊ लागला. शेवटी भयभीत होऊन चंद्रदेवांनी महादेवाची आराधना करण्यास सुरुवात केली. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला अभय देऊन आपल्या मस्तकावर धारण केले. सर्व देवांनी मिळून गणपतीला समजावले आणि बाप्पाने एक उष्शाप दिला. जो कोणी गणेश चतुर्थीला चंद्र पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल असे सांगितले गेले म्हणूनच या दिवशी चंद्र दर्शन करू नये असे सांगितले जाते.


FAQ:-

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली?

सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९४ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.

गणेश चतुर्थी दिवशी चंद्राचे तोंड का पाहू नये?

पौराणिक कथेनुसार या दिवशी चंद्राचे तोंड पाहिल्यास चोरीचा आळ येतो म्हणून या दिवशी चंद्र पाहू नये.

हे हि वाचा -  महाराष्ट्रात लागू झाली आचार संहिता, Vidhan Sabha Election