राज्याच्या विधानसभा निवडणुकीत Mahayuti ने मोठं यश मिळवलं. आता २ डिसेंबरला मुख्यमंत्रिपद साठी शपविधी सोहळा होईल, अशी माहिती समोर आली आहे. त्यापूर्वी, Mahayuti सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार आणि कोणाचं नाव कट होणार यावर चर्चा सुरू झाली आहे. एपीबी ने दिलेल्या माहितीनुसार, भाजपला २० ते २५ मंत्रिपदं मिळतील, शिवसेना शिंदे गटाला १० ते १२ आणि अजित पवार गटाला ७ ते ९ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
Mahayuti सरकारच्या संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली आहे.
हे हि वाचायला हवे – Eknath Shinde शिवसेना गटाचा धूर, एकूण ५७ जागांवर दणदणीत विजय, पहा पूर्ण लिस्ट
भा.ज.प. च्या संभाव्य मंत्र्यांची यादी (Mahayuti ):
- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
- गिरीश महाजन
- रविंद्र चव्हाण
- मंगलप्रभात लोढा
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष शेलार
- नितेश राणे
- शिवेंद्रसिंह राजे भोसले
- राहुल कुल
- माधुरी मिसाळ
- संजय कुटे
- राधाकृष्ण विखे पाटील
- गणेश नाईक
- पंकजा मुंडे
- गोपीचंद पडळकर
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी:
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- गुलाबराव पाटील
- संजय शिरसाट
- भरत गोगावले
- प्रकाश सुर्वे
- प्रताप सरनाईक
- तानाजी सावंत
- राजेश क्षीरसागर
- आशिष जैस्वाल
- निलेश राणे
राष्ट्रवादी संभाव्य मंत्र्यांची यादी:
- अजित पवार
- धनंजय मुंडे
- छगन भुजबळ
- अदिती तटकरे
- अनिल पाटील
- हसन मुश्रीफ
- धर्मराव बाबा अत्राम
Mahayuti मधील एकनाथ शिंदेंचा मोदींना फोन:
शिंदे गटाला एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री होणं हवं होतं. त्यासाठी भा.ज.प. वर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भा.ज.प. ने मुख्यमंत्री पदाचा ताबा सोडला नाही. अखेर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास ठरलं आहे. यानंतर, एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मौन सोडलं. त्यांनी सांगितलं की, सरकार स्थापनेसाठी त्यांना काहीही अडचण नाही. भा.ज.प. ने त्यांच्या गटाला अडीच वर्ष सोबत दिली, त्यामुळे त्यांचा कोणताही निर्णय मान्य असेल. तसेच, शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन करून सांगितलं की, सत्ता स्थापनेसाठी त्यांना काहीही अडचण नाही आणि भा.ज.प. जे निर्णय घेईल ते मान्य असेल.