महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता

Belgaum Belgavkar
2 Min Read

Abhijeet Bhattacharya makes controversial remarks about Mahatma Gandhi

“Mahatma Gandhi was the father of nation for Pakistan, not India”

 

 

अभिजीत भट्टाचार्य यांचं वादग्रस्त विधान

 

बॉलीवुड सिंगर (Playback singer Abhijeet Bhattacharya) अभिजीत भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीदरम्यान सलमान खान, शाहरुख खानसोबतच महात्मा गांधींवरही भाष्य केले आहे. यावेळी भट्टाचार्य म्हणाले, “संगितकार आरडी बरमन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. बरमन हे संगित विश्वाचे राष्ट्रपिता होते.” एवढेच नाही, तर “महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते”, असेही भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षा मोठे होते. ज्याप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रपिता होते त्याचप्रमाणे आरडी बर्मन हे संगीत विश्वाचे राष्ट्रपिता होते.

 

अभिजीत भट्टाचार्य म्हणाले,महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे, तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भारत तर आधीपासूनच भारत होता. पाकिस्तान तयार करण्यात आला. चुकून महात्मा गांधींना येथील राष्ट्रपिता सांगण्यात आले. जन्मदाते तर तेच होते. पिताही ते होते. अजोबाही ते होते, सर्व काही तेच होते.

 

 

अभिजीत भट्टाचार्य यांच्या कामासंदर्भात बोलायचे झाल्यास, त्यांना संगीतकार आरडी बर्मन यांनी लाँच केले होते. त्यांनी त्यांचे पहिले गाणे आशा भोसले यांच्यासोबत बंगाली चित्रपटासाठी गायले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते आरडी बर्मन यांच्यासोबत गायक म्हणून स्टेज शो करायचे. अभिजीत भट्टाचार्य यांनी मिथुन चक्रवर्ती, विजय आनंद, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, सनी देओल, संजय दत्त, अक्षय खन्ना, अक्षय कुमार, हृतिक रोशन, बॉबी देओल आणि रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांसाठी गाणे गायले आहे.
#AbhijeetBhattacharya #MahatmaGandhi #ControversialRemarks #Bollywood #PlaybackSinger #RDBurman #FatherOfTheNation #Pakistan #India #MusicIndustry #BollywoodMusic #CulturalDebate #IndianCinema #ViralNews #SocialMediaBuzz #CelebrityNews #Podcast #MusicLegends #GandhiControversy #BollywoodStars

Mahatma Gandhi was the father of nation for Pakistan

Mahatma Gandhi was the father of nation for Pakistan

Mahatma Gandhi was the father of nation for Pakistan

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *