- Maharashtra Winter Forecast
- Hailstorms and Rain Predicted
- हिवाळ्यात पावसाचे संकट
- या जिल्ह्यांना अलर्ट, IMD ने इशारा दिला
बंगालच्या उपसागरातील पूर्वमध्य क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने आता हवामानात बदल पहायला मिळतोय. बहुतांश भागात किमान तापमानात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. वर्ष अखेरीस देशातील अनेक राज्यात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
25 डिसेंबरपासून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परिणामी 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामांतज्ञानी डिसेंबर आखेरीस होत असलेल्या वातावरण बदलावर अंदाज वर्तवला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी पुन्हा परतण्याची शक्यता आहे. संक्रातीवेळी संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंडी असेल. डिसेंबरच्या अखेरीस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळे काही भागात थंडी देखील कमी होत आहे. तर दुसरीकडे देशाच्या उत्तरेकडील सीमेपलीकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग काहीसा मंदावला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेलसीयसने वाढ होणार आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील दिला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात हा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्रात 26 ते 28 डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 26 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भागात पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Winter Forecast Hailstorms and Rain
Maharashtra Winter Forecast Hailstorms and Rain