Maharashtra rain news today – हवामान विभागाने उद्यापासून परत जोरात पावसाला सुरुवात होत आहे असा अलर्ट दिला आहे. भारतात सर्व राज्यांमध्ये पाउसाची जोरदार बेटिंग चालू आहे. कुठे मुसळधार तर कुठे संततधार असा पाउस चालू आहे. यावर्षी हवामान खात्याने अंदाज दिलाच होता की पाउस यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा १२० टक्के जास्त होईल. काही ठिकाणी मागच्या १२५ वर्ष एवढा जास्त पाउस झाला नाही इतका पाउस पडला. आज रात्रीपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे.
कोल्हापूर ला मोठे संकट (Kolhapur District Red Alart)
Maharashtra rain news today – आज रात्री १२ वाजल्यापासून पाउसाचा जोर वाढणार आहे. कोल्हापूर, सांगली ला आधीच पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच हवामान खात्याला पुन्हा रेड अलर्ट (RED ALART ) दिला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मुसळधार पाउस कोल्हापूर ला पडणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (ORANGE ALART) देण्यात आला आहे. २ ऑगस्ट च्या रात्री म्हणजेच ३ तारखेला पाउस पुन्हा जोराचा चालू होईल असे सांगण्यात आले. आहे.
महाराष्ट्रातील सर्व धरणे भरली (All the dams in Maharashtra )
मागच्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व धरणे ८० टक्के पेक्षा जास्त भरली आहेत त्यामुळे जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होऊन सर्व जनजीवन विस्कळीत होते. याही वर्षी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे हि वाचा – एकीकडे असह्य तापमान तर दुसरीकडे पाउस- वाहरे मान्सून Mansoon Update
पावसाची अलर्ट ची यादी (List of rain alerts District wise)
हवामान खात्याने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना रेड, येलो, ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. खाली यादी देत आहोत पहा तुमच्याकडे किती पाऊस पडणार
रेड अलर्ट (जिल्हा ) | ऑरेंज अलर्ट (जिल्हा) | यलो अलर्ट (जिल्हा) | विजांसह पाऊस |
कोल्हापूर | पुणे | ठाणे | अकोला |
रायगड | वाशीम | बुलढाणा | |
सिंधुदुर्ग | गडचिरोली | जालना | |
सातारा | पालघर | हिंगोली | |
रत्नागिरी | मुंबई | परभणी | |
यवतमाळ | वर्धा | ||
चंद्रपूर | गोंदिया | ||
भंडारा | |||
वर्धा | |||
अमरावती |
दिनांक ०२/०८/२०२४ चा प्रमुख धरणांचा पाणीसाठा % मध्ये (Water storage of major dams)
क्र. | धरण नाव | जिल्हा | पाणी % मध्ये |
१ | तानसा धरण (TANSA DAM) | ठाणे | ९९.५५ |
२ | वीर धरण | सातारा | ९५.५९ |
३ | कोयना धरण | सातारा | ८१.३८ |
४ | वारणा धरण | सांगली | ८२.७४ |
५ | टेमघर धरण | पुणे | ९५.८१ |
६ | पानशेत धरण | पुणे | ९०.८९ |
७ | डिंभे धारण | पुणे | ८०.८६ |
८ | दुधगंगा धरण | कोल्हापूर | ८७.०० |
९ | मुळा धरण | अहमदनगर | ५७.३८ |
१० | पैठण ( जायकवाडी) धरण | छत्रपती संभाजीनगर | ९.४० |