महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सदर करण्यात आला आहे त्यामध्ये सुमारे ६ लाख १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मागच्या महिन्यात पूर्ण देशात निवडणुका झाल्या आहेत. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री माननीय श्री. अजित पवार (Ajit Pawar ) यांनी २०२४ चा मोठा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये विशेष करून शेतकरी, महिला आणि वारकरी यांसाठी मोठे पकेज जाहीर केले.
शेतकरी (Farmer) अर्थसंकल्प सविस्तर
शेतकऱ्यांची मुख्य मागणी म्हणजे शेतीचे वीजबिल (Light Bill) माफ व्हावे, हि मागणी या अर्थसंकल्पात मान्य केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सुमारे ४४ लाख मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. हि सवलत ‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत’ योजनेतून देण्यात आली आहे. तसेच दुध उत्पादक शेतकरी हि खुश करून टाकले आहे. सध्या चारा कमतरता, भुसा सुग्रास महागाई आणि दुधाचे दर कमी होत चालल्याने दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. हि योजना पुढे चालू ठेवण्यात आली आहे. शेतकरी वर्गाला शेती माल साठवणीसाठी ‘गाव तेथे गोदाम’ हि नवीन योजना चालू केली आहे, त्याचप्रमाणे जी जुनी गोदामे दुरुस्तीला आहेत त्यांना दुरुस्तीसाठी हि खर्च जाहीर केला आहे. शेती साठी वीज उपलब्ध व्हावी म्हणनू मागेल त्याला सौर पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सौर उर्जा निर्मिती साठी १५ हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०२३-२४ सालातील कांद्याला प्रती क्विन्टल ३५० रु. अनुदान हि जाहीर केले आहे.
महिलांसाठीही (Women) आर्थिक दृष्ट्या सबळ करण्यासाठी योजना
महत्वाचे म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजने अंतर्गत ज्यांचे वयोगट २१ ते ६० मध्ये आहे त्यांना प्रत्येकी दरमहा रु. १५०० मिळणार आहेत. तसेच ज्या दुर्बल महिला रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करण्यास इच्छुक आहेत त्यांना ‘पिंक इ रिक्षा’ या योजनेतून रिक्षा देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी अर्थसंकल्पात रु. ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ या योजनेनुसार महाराष्ट्रातील ५२ लाख कुटुंबांना वार्षिक ३ गेस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. महिलांनी जर लघुउद्योग चालू केल्यास ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप’ या योजने अंतर्गत १५ लाखांपर्यंत कर्जाचे व्याज परतावा यामधून होणार आहे, तसेच दुसरी म्हणजे ‘ लखपती दीदी’ याही योजनेंतर्गत महीला बचत गटांना निधी १५००० वरून ३०००० केला आहे. तसेच मुलींसाठी शिक्षणात हि १०० टक्के सुट देण्यात आली आहे. ज्या मुली अभियांत्रिकी, वास्तुशात्र, वैद्यकीय, कृषी विषयक पदवी, औषध निर्माण शास्त्र अश्या सर्व व्यावसाईक पदवी घेणार आहेत किंवा शक्षण घेणार आहेत आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख च्या कमी आहे त्यांना शिक्षणाच्या फी मध्ये १०० टक्के सुत देण्यात येईल .
युवकांसाठी (Youth) हि २०२४ अर्थसंकल्पामध्ये केली आहे तरतूद
अल्पसंख्यांक विद्यार्थी जे विदेशी शिक्षण घेत आहेत त्यांना शिषवृत्ती जाहीर केली आहे. उसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी फिरावे लागू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने मुलांसाठी ८२ वसतिगृहे बांधण्याची मंजुरी दिली आहे. ‘मुख्यमंत्री युवा कार्याप्रशिक्षण योजने’ अंतर्गत तरुणांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये विद्या वेतन देण्यात येणार आहे. गुंतवणूक वाढण्यासाठी लघु वस्त्रउद्योग संकुले आणि टेक्निकल टेक्स्टटाईल पार्क उभारणीवर भर देणार. तसेच वेळोवेळी शासनाच्या ज्या योजना येतात त्याची पूर्ण अचूक माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी दर वर्षी ५० हजार तरुणांना प्रशिक्षण देणार. त्याचप्रमाणे सिधुदुर्ग मध्ये मोठ्ठा आंतरराष्ट्रीय पाणबुडी प्रकल्प तयार करणार ज्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पासाठी रु. ६६ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि यामधून जवळ जवळ ८०० तरुणांना रोजगार निर्मिती होणार आहे.
त्याचबरोबर पूर्ण राज्यभर पेट्रोल आणि डीझेल च्या किंमती कमी व्हाव्यात यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
२०२४ महाराष्ट्र अर्थसंकल्प काही ठळक मुद्दे
पंढरपूर वारीसाठी तरतूद
- पंढरपूर पायी वारीतील मुख्य पालख्यांना प्रत्येकी रु. २०००० आर्थिक मदत.
- पंढरपूरच्या वारीला जागतिक वारसा मिळावा यासाठी युनेस्को कडे प्रस्ताव पाठविला.
- पंढरपूर वारी चा प्रमुख प्रश्न म्हणजे, ‘निर्मल वारी’ साठी महाराष्ट्र शासनाकडून ३६ कोटी ७१ लाख रुपयाचा निधी जाहीर.
- देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गावरील पायी वारीतील सर्व वारकरी जणांचे मोफत वैद्यकीय तपासणीसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात तरतूद.
महिलांसाठी विविध योजनांची घोषणा
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना – प्रत्येक महिलेला प्रती माह रु. १५०० देण्याची तरतूद.
- दिनांक १ मे २०२४ नंतर जन्माला येणारे मुल जन्मनोंदणी करताना मुलाचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव नंतर आडनाव सक्तीचे.
- महिलांसाठी रिक्षा खरेदीसाठी १० महिलांना अर्थसहाय्य.
- अन्नपूर्णा योजनेतून प्रत्येक घरटी वर्षाला ३ सिलेंडर मोफत देण्याची तरतूद.
- लखपती दीदी योजने अंतर्गत ७ लाख नवीन महिला बचत गटांची स्थापना करणार आणि बचत गटामार्फत तयार केलेला माल उमेद मार्ट मार्फत विकला जाणार.
शेतकरी साठी हि अनेक योजना
- दुध उत्पादन करणारे शेतकरी यांना प्रती लिटर ५ रु. अनुदान जाहीर.
- १० हजार हेक्टार खाजगी शेतीमध्ये बांबू लागवड करणार, पत्येक बांबू रोपासाठी र. १७५ ची तरतूद.
- मागेल त्याला सौर पंप योजना
- वन्य प्राण्यांच्या हल्यात मृत्यू झालेल्या ना नुकसान भरपायी रु. २५ लाख तरतूद.
- १०८ सिंचन प्रकल्पांना शासकीय मान्यता.
2 thoughts on “शेतीचे लाईट बिल माफ, महिलांना महिना १५०० रु. मिळणार – नवीन अर्थसंकल्प २०२४ ( Maharashtra Budget 2024) जाहीर”