Indian-origin co-founder who sold startup for $975 million?
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यावर साधारणपणे लोकं गाणी ऐकतात, बाहेर एकांतात बसतात, दारु ढोसतात किंवा मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवतात. पण एका पठ्ठ्याने असं काही केलं की कोणालाही धक्काच बसेल. गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने एका मुलाने चक्क त्याची कंपनीच विकली. आता तुम्हाला हे वाचून वाटलं असेल की याने किती मोठं नुकसान करून घेतलं स्वत:चं. पण खरंतर यापेक्षा थोडं उलट घडलं आहे.
Loom co-founder Vinay Hiremaths revelations after $975 million sale
कारण या मुलाने ब्रेकअप झाल्याच्या दु:खात आपली कंपनी विकली, पण त्यानंतर त्याला एवढा पैसा मिळाला की त्याला पुन्हा कधी काम करण्याची गरजच नाही. होय, हे खरं आहे. या मुलाला एवढा पैसा मिळाला की चक्क आता त्याला प्रश्न पडला आहे की एवढ्या पैशांच करायचं काय? या तरुणाचे नाव आहे विनय हिरेमठ. 33 वर्षीय विनय हा भारतीय वंशांचा उद्योजक असून तो अमेरिकेत वास्तव्यास आहे. विनय हा ‘लूम’ नावाच्या कंपनीचा सहसंस्थापक आहे. त्याने आपली ही स्टार्टअप कंपनी सन 2023 मध्ये $ 975 मिलियन डॉलर्सला विकली.
‘I am rich and I have no idea what to do’ : Vinay Hiremath after selling startup for $975 million
आपल्या प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाल्यानं विनयने कंपनी विकली. विशेष म्हणजे विनयने आपली कंपनी काही कोटींना नाही तर तब्बल 975 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच ₹ 8368 कोटी रुपयांना विकली आहे. त्यामुळे त्याने आता एक ब्लॉग लिहून एवढ्या पैशांचं काय करु असं विचारलं आहे, तसेच नेमकं आयुष्यात काय काय घडतंय याबद्दलही सांगितलं आहे.
विनयच्या कंपनीला एटलसियन या कंपनीने विकत घेतलं. या व्यवहारामुळे रातोरात विनय अब्जाधीश झाला. विनयने याबाबतच एक लांबलचक ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये विनयने त्यांच्या आयुष्यात होत असलेल्या बदलांवरही भाष्य केलं आहे.
त्याने ब्लॉगमध्ये लिहिलं आहे, “मी फार श्रीमंत झालो आहे. आता मी माझ्या आयुष्यात काय करु हे मला कळत नाहीये. मागील वर्ष माझ्यासाठी फारच खडतर होतं. मागील वर्षी मी कंपनी विकल्यानंतर आता स्वत:ला फार अवघडलेल्या अवस्थेत पाहतोय,” असं म्हणत त्याने त्याच्याकडील पैशांचे स्वरुप सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
विनय पुढे म्हणाला, “मला आता आयुष्यभर कोणतंही काम करण्याची गरज नाहीये. मला प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन्य जाणवतंय पण त्यात प्रेरणा घेण्यासारखं काही नाहीये. मी आताच एवढा पैसा कमवला आहे की या पैशांचं काय करायचं मला कळत नाहीये. प्रेयसीबरोबरीच दोन वर्ष फार छान गेली. मात्र असुरक्षित वाटत असल्याने आमचं ब्रेकअप झालं. हे फारच दु:खद होतं. मात्र निर्णय घेणं योग्यच होतं,” असं म्हणतं विनयने त्याच्या रिलेशनशिपबद्दल, त्याच्या ब्रेकअपबद्दल वैगरे सांगितलं आहे.
एवढच नाही तर, विनयच्या ‘लूम’ कंपनीला विकत घेणाऱ्या कंपनीने त्याला सीटीओ म्हणजेच मुख्य तांत्रिक अधिकारी होण्यासाठी 60 मिलियन डॉलर्सच्या पॅकेजसहीत जॉब ऑफर केला होता. मात्र त्याने समोर आलेल्या या जॉब ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नसल्याचंही विनयने म्हटलं आहे. विनयला एलन मस्कप्रमाणे व्हायचं असल्याची इच्छा त्याने ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान अगदी कमी वयात आपल्या मेहनतीने यशस्वी झालेले आणि आपल्या बळावर आपला उद्योगाला प्रचंड मोठं करणारे अल्पवधीत अब्जाधीश होतात. अशाच तरुणांपैकी एक म्हणजे विनय हिरेमथ आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. विनयच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस् केल्या आहेत.
Loom co-founder Vinay Hiremath
Loom co-founder Vinay Hiremath
Loom co-founder Vinay Hiremath