Most air-polluted cities : जगातील ५० प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारताची ४२ शहरे होती. जागतिक यादीतील भारतातील पहिल्या तीन शहरांमध्ये बेगुसराय (बिहार), गुवाहाटी (आसाम) आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे. देशांचे पाहिल्यास पहिल्या पाच देशात अनुक्रमे बांगलादेश, पाकिस्तान, भारत, ताजिकिस्तान, बुर्किनो फासो या देशांचा समावेश आहे.
जसे औद्योगिकीकरण वाढत आहे तसे त्याचे परिणाम निसर्गावर देखील होत आहेत. यातीलच एक परिणाम म्हणजे वायू प्रदूषण.
स्वित्झर्लंड मधील ‘आय. क्यू. एअर’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार (most air-polluted cities) भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वायू प्रदूषण असलेला देश बनला आहे. २०२३ मधल्या या यादीत प्रथम क्रमांकावर बांगलादेश, दुसऱ्या स्थानावर पाकिस्तान आणि तिसऱ्या स्थानावर भारत आहे. या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक वायू प्रदूषित शहर म्हणून बिहारमधील बेगुसराय ठरले आहे. सर्वात जास्त वायू प्रदूषण असलेल्या राजधानी दिल्लीचे नाव यंदादेखील या यादीत आले आहे. सर्वाधिक प्रदूषण असलेल्या या यादीत २०१८ पासून चार वेळा दिल्लीचे नाव आलेले आहे.
पी एम २.५ चा स्तर WHO च्या मानकानुसार बांगलादेश, पाकिस्तान, भारत, ताजिकिस्तान आणि बुर्किनो या देशात अनुक्रमे ७९.९१५ पट, ७३.७१४, ५४.४१०, ४९.९ आणि ४६.६८ पट आहे.
भारतात प्रदूषण वाढण्याची कारणे काय आहेत? (most air-polluted cities)
या संपूर्ण वायू प्रदुषणापैकी ५०% हून अधिक प्रदूषण हे उद्योगातून होते. २७% वाहनांमुळे, १७% पिके जाळल्यामुळे तर ७% घरगुती स्वयंपाकामुळे होते. शहरी भागातील प्रदूषण औद्योगिक कारणामुळे तर ग्रामीण भागातील सर्वाधिक प्रदूषण सेंद्रिय पदार्थांच्या ज्वलनाने होते. घरगुती चुली साठी जाळण्यात येणारे लाकूड, सुकलेली पाने, गवत आणि जनावरांच्या वाळलेल्या शेणामुळे जास्त प्रदूषण होते.
शेणाच्या गोवऱ्या जाळल्याने कोळसा जाळण्याच्या तुलनेत पाच पट अधिक धूर होतो आणि त्यातून प्रदूषके देखील जास्त प्रमाणात बाहेर पडतात. असे मानले जाते की १०० दशलक्षाहून अधिक कुटुंबे अश्या चुली वापरतात. दिवसातून तीन वेळा आठवड्याचे सातही दिवस हे वापरले जाते.
रिक्षा, टॅक्सी या इंधनावर चालतात त्यात स्वस्त घटकांची भेसळ केली जाते. संपूर्ण दक्षिण आशियात ही एक सामान्य गोष्ट आहे. भारतातील कर प्रणाली पाहता डिझेल पेक्षा पेट्रोलच्या किमती अधिक आहेत. कमी वेतन असणाऱ्या व्यक्तींना इंधनात कमी खर्चिक घटक मिसळून ते वापरणे सोयीचे होते. ही भेसळ ३०% पर्यंत बचत करू शकते.
शहरात सतत सुरू असणारी वाहनांची वर्दळ पाहता वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आणि त्यामुळेही वायू प्रदूषण होते. त्याचप्रमाणे वाढत्या शहरीकरणामुळेही वायू प्रदूषण होत आहे. जुन्या इमारती तोडून नवीन बांधणे, नव्या इमारतींचे बांधकाम, पूल बांधकाम इत्यादीमुळे प्रदूषण वाढत आहे.
राजधानी दिल्ली बद्दल बोलायचे झाल्यास तेथील हवेची गुणवत्ता दर हिवाळ्यात नेहमीच गंभीर श्रेणीत असते. शक्यतो पुढील हंगामाच्या पीक लागवडीसाठी आधीच्या पिकांची तणे जाळून नष्ट केली जातात. यात वारा आणि पाऊस अशी हवामानाची परिस्थिती महत्त्वाची भूमिका बजावते.
प्रदूषित हवेमुळे आरोग्यावर काय परिणाम होतात? (most air-polluted cities)
WHO ने शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त खराब हवेमुळे अनेक आजार होऊ शकतात. अश्या प्रदूषित हवेच्या संपर्कात आलेल्यांना श्वसनाचे विकार होतात. अहवालानुसार २०१९ मध्ये १.६ दशलक्षाहून अधिक मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झालेले आहेत. Strok, फुस्फुसाचे आजार हे प्रदूषित हवेमुळे होतात.
वायू प्रदूषणामुळे (most air-polluted cities) लहान बालके त्यांच्या आयुष्याच्या पहिल्याच महिन्यात दगावतात. ही आकडेवारी एक लाखाहून अधिक आहे. यातील सगळ्यात जास्त आकडेवारी ही घरगुती वायू प्रदूषणामुळे आहे. म्हणजेच घर गरम ठेवण्यासाठी तसेच चुलीसाठी जे इंधन म्हणून जळणावळ जाळले जाते त्यामुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
या हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मानवाच्या श्वसन प्रणालीवर गंभीर परिणाम होतात. लहान आकाराचे धूलिकण माणसाच्या फुस्फुसात जातात आणि नंतर शरीराच्या उतीमध्ये पसरतात. घसा खवखवणे, खोकला, थकवा, फुस्फुसाचा कर्करोग आणि डोकेदुखी अशी काही लक्षणे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजाराची असतात.
यावर डॉक्टरांचे मत काय?
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील एका डॉक्टरांनी असे सांगितले की, जेव्हा त्यांनी ३० वर्षांपूर्वी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा त्यांच्याकडे येणारे रुग्ण हे वयाच्या साठीच्या आसपास असणारे धूम्रपान करणारे पुरुष होते. आता मात्र त्यांच्याकडे येणारे रुग्ण हे तरुण, धूम्रपान न करणारे आहेत आणि यात ४०% महिलांचा समावेश आहे. सीओपीडी किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हे आता हृदयविकारामागे मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे.
भारतात वायू प्रदूषण (most air-polluted cities) कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत?
गाड्यांना BS6 मानके पूर्ण करणे आवश्यक आहे. आता भारतात इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. इंधन बचत आणि प्रदूषण रोखण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर खतात करण्यासाठी भाड्याने मशीन उपलब्ध करून दिले जात आहे. ज्यामुळे कापणी नंतर पेंढा जाळण्याची गरज उरत नाही.
FAQ:-
जगातील सर्वाधिक वायू प्रदूषण (most air-polluted cities) असलेला देश कोणता?
जगातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेला देश बांगलादेश आहे.
What is the rank of Delhi pollution?
Delhi was the most polluted capital city in the world in 2023
Which is the no. 1 cleanest city in the world?
Copenhagen, Denmark: The cleanest city on the planet